You are currently viewing शहरातील सिसिटीव्ही कॅमेऱ्यांची संख्या वाढवा – मंगेश तळवणेकर 

शहरातील सिसिटीव्ही कॅमेऱ्यांची संख्या वाढवा – मंगेश तळवणेकर 

सावंतवाडी

शहरात बसविण्यात आलेले बरेच सीसीटीव्ही कॅमेरे बंदावस्थेत असून काहीमध्ये रेकॉडिंग होत नाही. त्यामळे शहरात घडलेल्या खुनासारख्या गंभीर गुन्ह्यांची अद्याप उकल झालेली नाही. त्याचप्रमाणे तालुक्यासह ज़िल्ह्यातही पोलीसबळ अत्यल्प प्रमाणात आहे. याचा विचार करून शहरातील सिसिटीव्ही कॅमेऱ्यांची संख्या वाढवावी. तसेच पोलीस संरक्षणाताही वाढ करावी, अशी मागणी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष सामाजिक कार्यकर्ते मंगेश तळवणेकर यांनी पालकमंत्री उदय सामंत, आमदार दीपक केसरकर, केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्याकडे केली आहे.

प्रसिद्ध पत्रकात तळवणेकर म्हणाले हल्लीच झालेल्या खून व चोरी प्रकरणातील आरोपी अद्यापही मिळत नाहीत याचे मुख्य कारण शहरात सी.सी.टी.व्ही. मुळातच फार नगण्य आहेत. तसेच जे आहेत ते एकतर बंद आहेत किंवा त्यांचे रेकॉडींर्ग होत नाही. सावंतवाडी शहरातील नगरपरिषदेचे उत्पन्न हे सिंधुदुर्ग जिल्ह्यात सर्वात जास्त आहे. त्यामुळे शहरातील प्रत्येक चौकात, तिठ्यावर, रस्ता दुभांजकाजवळ, सार्वजनिक ठिकाणी सी.सी.टी.व्ही. कॅमरे लावण्यात यावेत. तसेच बंद पडलेले कॅमेरे तातडीने कार्यान्वीत करावेत. त्यासाठी पालकमंत्र्यांनी नगरपरिषदेसाठी भरीव निधी द्यावा, त्याचप्रमाणे नगरपरिषदेने आपल्या अंदाजपत्रकात त्यासाठी भरीत तरतुद करावी.

शहरात परगावातून येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीच्या हालचालीवर तो शहरातून बाहेर जाईपर्यंत बारीक नजर ठेवणे आवश्यक आहे. परराज्यातील व्यापारी, कामगार यांची ओळखपत्रे नगरपरिषदेचे जवळ असणे अत्यंत गरजेचे आहे. नगर जिल्ह्यातील पाटोदे गावातील ग्रामपंचायतीने कमी उत्पन्न असूनही गावात ठिकठिकाणी सी.सी.टी.व्ही. कॅमरे बसविले आहेत. त्यामुळे गावात कोणत्याही बाजूने कोणीही प्रवेश केला तरी त्याच्या सर्व हालचाली या कॅमेऱ्यातून टिपल्या जातात. त्यासाठी ग्रा.पं. कार्यालयात स्पेशल कर्मचाऱ्यांची नेमणुक केली आहे. कुठलाही गुन्हा घडला की, पहिल्यांदा पोलीसांना दोष दिला जातो. पोलीस बांधवांची जिल्ह्यात सरासरी 50 टक्के एवढीच आहे. त्यामुळे त्यांना बऱ्याचदा 18/18 तास ड्युटी बजावावी लागते. कॅबिनेट मंत्री नारायण राणे, पालकमंत्री उदय सामंत, स्थानिक आमदार दीपक केसरकर यांनी या सर्व बाबींचा गांभीर्याने विचार करावा, अशी मागणी तळवणेकर यांनी केली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा