कणकवली:
नगरपंचायत च्या सुधारित शहर विकास आराखड्याचा ड्रोन सर्व्हे आता 6 ऐवजी 8 नोव्हेंबरपासून सुरू करण्यात येणार आहे. गेले चार दिवस पावसाचे वातावरण असल्यामुळे सोमवार 8 नोव्हेंबर पासून 10 नोव्हेंबर पर्यत हा सर्व्हे करण्यात येणार आहे. या ड्रोन सर्व्हे करिता नियुक्त करण्यात आलेल्या टंडन अर्बन सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड या कंपनी मार्फत हा सर्व्हे सुरू करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. या सर्व्हे करिता पूर्वतयारी साठी टंडन अर्बन सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड कंपनी ची टेक्निकल टीम आज रविवारी 7 नोव्हेंबर रोजी कणकवलीत दाखल होणार आहे. कणकवली शहरात ड्रोन द्वारे सर्व्हे करण्याकरिता एकूण 47 पॉईंट निश्चित करण्यात आले असून त्या पॉईंटवरून हा सर्व्हे करण्यात येणार असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. दरम्यान आज कणकवलीत पूर्व तयारीकरिता कंपनीची टीम दाखल झाल्यानंतर ड्रोन सर्व्हे सुरू करण्यापूर्वी कणकवली पोलिस व नगरपंचायत प्रशासन यांनाही सदर सर्व्हे सुरू करत असल्याची माहिती दिली जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. त्यामुळे आता 8 नोव्हेंबर पासून कणकवली नगरपंचायत च्या सुधारित डीपी प्लान चा प्रत्यक्षात ड्रोन सर्वे सुरू होणार आहे.