वैभववाडी–
बेपत्ता झालेले सडुरे तांबळघाटी येथील बिरु शिवाजी काळे वय ४५ यांचा मृतदेह तब्बल दिड महीन्यानंतर आढळून आला आहे. शुक्रवारी सकाळी सडुरे राववाडीनजीक गणपती कोंड येथे सुखनदी पाञात हा मृतदेह सापडला आहे. कपड्यावरुन नातेवाईकांना त्यांची ओळख पटली आहे. वैभववाडी पोलिस ठाण्यात मृत्यू ची नोंद करण्यात आली आहे.
१४ सप्टेंबर रोजी बीरु काळे हे शेतात जातो असे सांगून घरातून गेले होते. त्यांची सर्वञ नातेवाईकांनी शोधाशोध केली. परंतु ते सापडले नव्हते. पती नापत्ता झालेची खबर पत्नीने दिली होती. दरम्यान शुक्रवारी सकाळी सडुरे राववाडीनजीक गणपती कोंड येथे ग्रामस्थांना मानवी सांगाडा आढळून आला. याबाबत वैभववाडी पोलिसांना खबर देण्यात आली. स.पोलिस उपनिरीक्षक देसाई व अशोक सावंत, हेड काॕ.खाडे, महिला पोलिस हवालदार माधुरी अडूळकर, पोलिस नाईक अभिजीत तावडे, पो.काॕ.संदीप राठोड, यांनी घटनास्थळी जाऊन जाऊन पंचनामा केला. मानवी सांगाड्यावर निळी पॕंट व लाल रंगाचा शर्ट होता. या कपड्यावरुन मयत काळे यांच्या मुलाने तो मृतदेह आपल्याच वडीलांचा असल्याचे पोलिसांना सांगितले. पोलिसांनी वैदयकीय अधिका-यांना याबाबत माहीती दिली. ग्रामीण रुग्णालयाचे डाॕ.धर्मे यांनी घटनास्थळी येऊन पाहणी केली.
विखुरलेल्या अवस्थेतील हा सांगाडा त्यांच्या नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. त्याच्यावर पुढील सोपस्कर कुटुंबीयांकडून करण्यात आले. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, दोन मुली , मुलगा असा परिवार आहे. यावेळी पोलिस पाटील शशिकांत नारकर, तंटामूक्त अध्यक्ष दीपक चव्हाण, माजी सरपंच विजय रावराणे,ग्रामपंचायत सदस्य नवलराज काळे, संजय जंगम, बिरू बोडेकर, संजय बोडेकर मोहन जंगम व ग्रामस्थ उपस्थित होते.