मुंबई/बांदा
सावंतवाडी तालुक्यातील डेगवे गावात गेली ७२ वर्षे सामाजिक,शैक्षणिक,व सांस्कृतिक विकासाचे काम करणाऱ्या मुंबईस्थित डेगवे ग्रामस्थ हितवर्धक संघ
आणि “हॅशटॅगचोच्या” यांच्या संयुक्त विद्यमानाने तरुणांची क्रेझ लक्षात घेऊन आगळीवेगळी Reels ची Online स्पर्धा आयोजित केली आहे.
तसेच भाजपचे मागाठाणे विधानसभा क्षेत्राचे सचिव व प्रसिद्ध समाजसेवक “श्री प्रसाद प्रभू” या स्पर्धेचे प्रायोजक आहेत. स्पर्धेचे परीक्षण सुप्रसिद्ध यूट्यूबर, दिग्दर्शक आणि छायाचित्रण संचालक ‘पराग सावंत’ हे करणार आहेत.
स्पर्धेच्या पहिल्या फेरीचा कालावधी 31 ऑक्टोबर ते 30 नोव्हेंबर असून स्पर्धेच्या अधिक माहितीसाठी इच्छुक स्पर्धकांनी 9867237440 (ओमकार देसाई सदस्य,डेगवे ग्रामस्थ हितवर्धक संघ,मुंबई) किंवा 9768026582(जयेश चांदे) यांस संपर्क करावा असे आवाहन डेगवे ग्रामस्थ हितवर्तक संघ, मुंबई या संस्थेचे अध्यक्ष तथा माजी आमदार गुरुनाथ देसाई व सरचिटणीस मा. श्री उल्हास देसाई यांनी संयुक्त पत्रकाराद्वारे केले आहे.गतवर्षी लाँकडानच्या काळात आँनलाईन “काव्यवाचन स्पर्धा”आयोजित केली होती.त्या स्पर्धेला महाराष्ट्रातून चांगला प्रतिसाद लाभला होता.
तरी या स्पर्धेत भाग घ्यावा असे संस्थेचे अध्यक्ष तथा माजी आमदार श्री गुरुनाथ देसाई यांनी स्पर्धकांना व आयोजकांना शुभेच्छा दिल्या.
*उल्हास देसाई.*
सरचिटणीस,डेगवे ग्रामस्थ हितवर्धक संघ,मुंबई