आम्ही बालकवी संस्था सिंधुदुर्गचे संस्थापक श्री राजेंद्र गोसावी यांची जुन्या काळातील दिवाळी विषयी माहिती देणारी काव्यरचना
चार वर्ष झाली तरी
लावतो पुन्हा पुन्हा
रंग थोडा विटलाय
कंदिल आहे चार वर्ष जुना
अर्ध अधिक तोरण
केव्हाच विझून गेले
दोन चार बल्प
शेवटच्या घटका मोजीत राहिले .
तेल महाग झाले
पणती केव्हाच विझली
अंधारात दिवा पाहिजे म्हणून
रुपया वाली मेणबत्ती लावली .
कशी असते मिठाई
कशी असते मिठाईची गोडी
चिमुट चिमुट साखर खावून
शिल्लक ठेवली थोडी
मळलेला शर्ट धुवून
नवा होतो
दिवाळी सणासाठी
वर्षानुवर्ष नवेपण मिरवितो .
हौसेची , मौजेची दिवाळी असते मोठी
ऐकलेली गोष्ट बाप सांगत सांगत गेला
बापाची तीच गोष्ट
आजही सांगतो मी पोराला
फराळाची , खरेदीची दिवाळी साजरी करावी
वर्षानुवर्ष आशेची पणती डोळयात तेवते
पाचविलच् पुजलेली गरिबीची फुंकर
अलगद ती मालविते .
राजेंद्र गोसावी .
आम्ही बालकवी संस्था , सिंधुदुर्ग
९४०५७७८७२६