मालवण
नरक चतुर्दशी निमित्ताने मालवणमध्ये आयोजित करण्यात आलेल्या नरकासुर स्पर्धेत बांगीवाडा मित्रमंडळाच्या हालत्या नरकासुराने प्रथम क्रमांक मिळवला. सिद्धीविनायक मित्रमंडळ स्टँड बॉईज यांनी द्वितीय तर ईस्वटी महापुरुष यांच्या नरकासुराने तृतीय क्रमांक मिळवला आहे.
मालवण मधील नरकासुर मिरवणूकीला वेगळं महत्त्व आहे.. यंदा नगरसेवक मंदार केणी आणि महापुरुष रेवतळे यांनी नरकासुर स्पर्धा आयोजित केल्याने तरुणाई मध्ये उत्साह वाढला होता. या स्पर्धेचे परीक्षण तारक कांबळी आणि श्री. जाधव सर यांनी केले. यावेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख बबन शिंदे, नगरसेवक मंदार केणी, आस्था ग्रुपचे अध्यक्ष उमेश मांजरेकर, किरण वाळके यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते. प्रथम तीन क्रमांकाना अनुक्रमे ५ हजार, ३ हजार आणि २ हजार रुपये पारितोषिक देण्यात आले. स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी सिद्धेश मांजरेकर, ललित चव्हाण, अस्मित चव्हाण, पंकज गावडे, शुभम लुडबे, सर्वेश लुडबे, शुभम मांजरेकर, बंटी मांजरेकर, उत्कर्ष मांजरेकर, ओंकार मांजरेकर, राजा मांजरेकर, सागर नरे, अक्षय मांजरेकर, नितेश नरे, श्रीराज बादेकर, निनाद बादेकर, चंदन मांजरेकर, मयू पारकर, अजू कांबळी, नयन मांजरेकर, विघ्नेश मांजरेकर यांच्यासह महापुरुष रेवतळेच्या अन्य कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.

