कणकवली
महापुरुष मित्रमंडळाने आयोजित केलेल्या नरकासुर स्पर्धेत ढालकाढी मित्रमंडळाने प्रथम क्रमांक पटकाविला. व्दितीय पटकीदेवी मित्रमंडळाने तर तृतीय आकश मित्रमंडळ, जळकेवाडी यांना मिळाला. विशेष पारितोषिक कोरोना मित्रमंडळ व आंबेआळी,मंडळाला देण्यात आला. या स्पर्धेच परीक्षण पी.एस.राणे यांनी केले. शहरातील महापुरुष मंदिरासमोर या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. विशेष म्हणजे या स्पर्धेतील नरकासूर पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती.
यावेळी महापुरुष मित्रमंडळाचे अध्यक्ष प्रसाद अंधारी, उपाध्यक्ष राजू पारकर, उद्योजक राजू मानकर, माजी नगरसेवक महेंद्र सांब्रेकर, उदय मुंज, चेतन अंधारी, विकास काणेकर, संदीप अंधारी,अनिकेत उचले,प्रथमेश चव्हाण,पांडू वर्दम, प्रज्वल वर्दम, सोहम वाळके, प्रद्युम मुंज, राज घेवारी, हरीष उचले, रुद्र सापळे, दत्ता तोरसकर, यश अंधारी, दिलीप पारकर, भालचंद्र अंधारी, रोशन मांगले, उपस्थित होते.स्पर्धेत अनुक्रमे क्रमांक पटकाविलेल्या मित्रमंडळांना 3000, 2000, 1000, रुपये व पारितोषिके मान्यवरांच्या हस्ते देण्यात आले. त्याचप्रमाणे विशेष पारितोषिक पटकाविलेल्या संघांना 1000 रुपये, तर सहभागी संघांना 500 रुपये मंडळातर्फे देत त्यांचा गौरव करण्यात आला. या स्पर्धेचे सूत्रसंचालन बाळू वालावकर यांनी केले.

