मंडळाकडून समाजातील विविध घटकांचा सन्मान
वेंगुर्ले
गेली १३ वर्षे सातत्याने रक्तदान शिबिर आयोजित करणाऱ्या कै. निलेश राऊळ मित्रमंडळाचा स्तुत्य उपक्रम आहे. मंडळाने अतिशय सूक्ष्म नियोजन करून समाजातील विविध घटकांचा सन्मान केला, याचे कौतुक करावे तेवढे कमीच. जिल्ह्यात १० वर्षांपूर्वी रक्ताची अतिशय कमतरता होती. मात्र आज विविध मंडळे अशाप्रकारे रक्तदान शिबिरे घेत आहेत, हे आपल्या जिल्ह्यासाठी भूषणावह आहे, असे प्रतिपादन जिल्हा परिषद अध्यक्षा संजना सावंत यांनी रेडी येथील रक्तदान शिबिर प्रसंगी केले.
वेंगुर्ला तालुक्यातील रेडी येथील कै. चंद्रकांत उर्फ निलेश राऊळ यांच्या स्मृतिदिना निमित्त कै. चंद्रकांत उर्फ निलेश राऊळ चॅरिटेबल ट्रस्ट, रेडी यांच्यावतीने आयोजित रक्तदान शिबिर, रेडी पंचक्रीशी कोरोना योद्धा सन्मान व पंचक्रोशीतील १० वी १२ वी तसेच गुणवंत विद्यार्थी सन्मान कार्यक्रमाचा शुभारंभ जिल्हा परिषद अध्यक्षा सौ. सावंत यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून तर पंचायत समिती सभापती अनुश्री कांबळी यांच्याहस्ते कै निलेश राऊळ यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आला.
यावेळी व्यासपीठावर जिल्हा परिषद उपाध्यक्ष राजेंद्र म्हापसेकर, माजी उपाध्यक्ष तथा गटनेत रणजित देसाई, महिला बालकल्याण सभापती शर्वाणी गावकर, जि प सदस्य राजन मुळीक, गजानन देवस्थान ट्रस्टचे प्रकाश कामत, वेतोबा देवस्थान विश्वस्त जयवंत राय, वेंगुर्ला उपनगराध्यक्षा शितल आंगचेकर, नगरसेविका पूनम जाधव, तुळस सरपंच शंकर घारे, वेंगुर्ले माजी सभापती अजित सावंत, रुपेश कानडे, उपजिल्हा रुग्णालयचे डॉ देसाई, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ अश्विनी माईणकर, शिरोडा श्री देवी माऊली देवस्थान विश्वस्त अशोक परब, डॉ प्रसाद साळगावकर, पेंडूर माजी सरपंच संतोष गावडे, रेडी सरपंच रामसिंग राणे, पं स सदस्य मंगेश कामत, शिरोडा सरपंच मनोज उगवेकर, उपसरपंच राहुल गावडे, आरवली सरपंच तातोबा कुडव, सागरतीर्थ सरपंच शेखर कुडव यांच्यासाहित आरवली, रेडी, शिरोडा, सागरतीर्थ ग्रामपंचायत सदस्य व विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.