सावंतवाडी
रॉकिंग जोशी ग्रुप मुंबई पुरस्कृत व ग्रामपंचायत नाणोस यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित आकाश कंदील तयार करण्याच्या कार्यशाळेत उत्सफूर्तपणे 38 मुलांनी सहभाग घेत प्रतिसाद दिला. बालवयात शालेय विद्यार्थ्यांच्या अंगी उपजत असलेल्या कलागुणांना हक्काचे व्यासपीठ मिळावे व त्यांच्या कलेचा विकास व्हावा यासाठी रॉकिंग जोशी ग्रुप मुंबई व ग्रामपंचायत नाणोस यांच्या संयुक्त विद्यमाने शालेय मुलांकरिता दिवाळी सुट्टीत आकाश कंदील तयार करण्यासाठी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.या कार्यशाळेला 38 मुलांनी सहभाग घेत उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
कार्यशाळेचे उद्घाटन शाळा नंबर एक मुख्याध्यापिका श्रद्धा चोडणकर यांनी दीपप्रज्वलन करून केले. तर तंटामुक्ती अध्यक्ष राजाराम नाणोसकर यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला. यावेळी सरपंच जोशी यांनी आपले मनोगत व्यक्त करत असताना या कार्यशाळेसाठी ग्रामपंचायतला आवश्यक असणारे साहित्य रॉकिंग जोशी ग्रुप मुंबई यांनी उपलब्ध करून दिल्याबद्दल त्यांचे आभार मानले. तसेच यापुढे गावातील मुलांचे शैक्षणिक व कलात्मक विकासाच्या दृष्टीने कार्यक्रम घेण्यात येणार असल्याचे सरपंच जोशी यांनी सांगत दीपावलीच्या सर्वांना शुभेच्छा दिल्या.
या कार्यशाळेसाठी मार्गदर्शक म्हणून भाईसाहेब सावंत माध्यमिक विद्यालय माजगाव चे कला शिक्षक सिद्धेश कानसे यांनी मुलांना आकाश कंदील तयार करण्याचे प्रात्यक्षिक दाखवले. या कार्यशाळेच्या शुभारंभप्रसंगी सुधाकर नाणोसकर,प्रशांत परब, निवेदिता पायनाईक, भाग्यश्री नाणोसकर, सविता नाणोसाकर, नम्रता नाणोसकर, ऊर्मिला नाणोसकर, विद्या नाणोसकर, शशिकला कांबळी, किशोरी गोडकर, भगवान शेट्ये, ग्रामस्थ, पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.