जागतिक मराठी साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्य राष्ट्रीय प्रतिभा पुरस्कारित ज्येष्ठ लेखक कवी प्रो डॉ जी आर उर्फ प्रवीण जोशी यांची काव्यरचना
तेजोमय दीप ज्योती
तिमीर हारक सरस्वती
अनादी अनन्त तू निर्मोहक
त्रिगुणात्मक सत्व प्रकाशक
ज्ञान वैराग्य वाचस्पति
तमोगुण तू नाशकरक
धी धृति स्मृती कारक
विद्यावन्त कला दायक
देवादीक पुजे ब्रहस्पति
तू सृजनाची माय दाता
सकळांची साहित्य सरिता
माय मराठी तू अमृता
लक्ष्य लक्ष्य दीप ज्योती
अक्षरांची शब्दकळा
शब्दांचा हिरवा मळा
नक्षत्रांचे झुरमाळ्या
सृजन अंगण फुलती
तिमीर हारक सरस्वती
रूप किती तुझे थोर
सप्तरंगी भाव विभोर
शब्द स्पर्श चित्तचोर
अलगद मज बिलगती
तिमिर हारक सरस्वती
प्रो डॉ प्रवीण जी आर जोशी
अंकली बेळगांव
कॉपी राईट
मनपुर्वक धन्यवाद