देवगड
इंटरनॅशनल ह्यूमन राईट्स ॲम्बेसिडर ऑर्गनाझेशन (आंतरराष्टीय मानवाधिकार राजदूत चळवळ )देवगड शाखेचा पद्ग्रहण सोहळा सोमवार दिनांक १नोव्हेंबर २०२१ रोजी श्री स्वामी समर्थ कार्यालय देवगड येथे पार पडला. या सोहळ्यात चळवळीची ध्येय, धोरणे ,उद्देश या विषयी विलास रुमडे यांनी प्रास्तविक करून मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. राष्ट्रीय अध्यक्ष डॉ अविनाश साकुंडे ,प्रदेशअध्यक्ष श्रुती कडू यांच्या मार्गदर्शनाखाली या संस्थेचे कार्य सुरू करण्यात येत आहे.निमित्ताने रवींद्र कांदळगावकर ,दयानंद मांगले, दयानंद तेली, दीक्षा तेली,भास्कर कुबल यांनी विचार मांडले. तसेच पुढील वाटचाली संदर्भात चर्चा करण्यात आली.
या सोहळ्यात कार्यकारणी सभासद तसेच पदाधिकारी यांचा पदग्रहण सोहळा पार पडला व प्रदेश सरचिटणीस विनोद पटेल यांच्या प्रमुख उपस्थितीत मान्यवरांच्या हस्ते नियुक्तीपत्र ओळखपत्र बॅच प्रदान करण्यात आला. यात प्रामुख्याने विनोद विठ्ठलदास पटेल-सरचिटणीस महाराष्ट्र प्रदेश, सुरेश सदानंद कदम-समन्वयक सिंधुदुर्ग जिल्हा दयानंद मांगले-मीडिया प्रेसिडेंट (,सिंधुदुर्ग जिल्हा) दयानंद अर्जुन तेली-अध्यक्ष देवगड तालुका विलास मुकुंद रुमडे-उपाध्यक्ष देवगड तालुका रवींद्र पांडुरंग कांदळगावकर-सरचिटणीस देवगड तालुका रवींद्र प्रभाकर चिंदरकर-चिटणीस देवगड तालुका दिक्षा दयानंद तेली-महीला अध्यक्षा देवगड तालुका शुभांगी तेली -महिला उपाध्यक्षा देवगड तालुका संजना सावन्त-महिला चिटणीस देवगड तालुका तृष्णा मनीष जाधव-विद्यार्थी शाखा देवगड तालुका ऍड अमेय गुमास्ते-कायदेविषयक सल्लागार देवगड तालुका तुकाराम तेली-शिक्षण विभाग देवगड तालुका किशोर उपाध्ये-अपंग विभाग जिल्हा अध्यक्ष प्रकाश जाधव-अपंग विभाग देवगड तालुका भास्कर कुबल-खजिनदार तसेच सदस्यपदी रविकांत मधुकर चांदोस्कर, उमेश दिलीप कुबडे , नन्दकिशोर शांताराम परब पद्माकर राऊत विजयकुमार जोशी यांनी पदभार स्वीकारला. तालुक्यातील गावनिहाय सदस्य निवड करण्यात आली.यात गिरीश धोपटे, निलरत्न मालंडकर,सचिन देशपांडे,शरद लाड,डॉ किरण पाटणकर,जितेद्र शिंदे,वसंत शहाकार सदानंद कुंभार,नितेश कुंभार,क्रकादिक लोणे,संदीप घाडी ऋणदेश मेस्त्री उमेश परब,तन्वी शिंदे,समीक्षा घाडी,यानी सदस्यत्व स्वीकारले.उपस्थितांचे आभार अध्यक्ष दयानंद तेली यांनी मानले.