कणकवली शहरवासीयांनी प्रदर्शनाचा लाभ घेण्याचे आवाहन
कणकवली
कणकवली नगरपंचायतीच्यावतीने स्वच्छ सर्वेक्षण 2022 अंतर्गत आयोजित केलेल्या रांगोळी स्पर्धेला उस्फुर्त प्रतिसाद मिळाला. कणकवली नगर वाचनालयाच्या हॉलमध्ये 15 स्पर्धकांनी या स्पर्धेत सहभाग घेतला. या स्पर्धेमध्ये माझी वसुंधरा (पर्यावरण संवर्धन),आझादी का अमृत मोहत्सव, स्वच्छ भारत अभियान यावर विषयावर स्पर्धकांनी रांगोळी रेखाटत स्वच्छता व पर्यावरण संवर्धनास सोबतच आझादी का अमृत महोत्सव या विषयावर जनजागृती करणाऱ्या रांगोळी साकारल्या. नगराध्यक्ष समीर नलावडे यांच्या हस्ते या रांगोळी स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी उपनगराध्यक्ष बंडू हर्णे, गटनेते संजय कामतेकर, नगरसेवक अभिजीत मुसळे, माजी उपनगराध्यक्ष किशोर राणे, उद्योजक राजू गवाणकर, बाळा सावंत, स्वच्छता निरीक्षक विनोद सावंत, सतीश कांबळे,प्रतिष खैरे, ध्वजा उचले आदी उपस्थित होते. यावेळी नगराध्यक्ष व पदाधिकाऱ्यांनी स्पर्धकांशी संवाद साधत त्यांनी रेखाटलेल्या रांगोळी बाबत नेमकी संकल्पना जाणून घेत स्पर्धकांचे सहभाग घेतल्याबद्दल कौतुकही केले. आज व उद्या दिवसभर कार्यालयीन वेळेत हे रांगोळी प्रदर्शन कणकवली शहरवासियांसाठी खुले असणार असल्याचेही यावेळी नगरपंचायत कडून स्पष्ट करण्यात आले.