मुंबई डिस्ट्रिक्ट ज्युनिअर अँड सीनियर क्योरूगी अँड पूम्से तायक्वांदो चॅम्पियनशिप 2021 स्पर्धा
मालवण
दादर मुंबई हिंदू कॉलनी येथील दिगंबर पाटकर गुरुजी विद्यालयाची इयत्ता दहावीची विद्यार्थिनी आणि नॅशनल तायक्वांदो कराटेपटू मालवण तालुक्यातील रामगड गावची कन्या निशा प्रमोद सोलकर हिने नुकत्याच बी पी सी एल कॉलेज वडाळा येथे ३० ऑक्टोंबर रोजी पार पडलेल्या मुंबई डिस्ट्रिक्ट जूनियर अँड सीनियर क्योरूगी अँड पूम्से तायक्वांदो चॅम्पियनशिप 2021 मध्ये मुलींच्या ज्युनियर गटामध्ये सुवर्णपदक पटकावले आहे. अंतिम फेरीत निशा हिने कनक घडीचा पराभव करून सुवर्णपदकाला गवसणी घातली.
सदर मानाची स्पर्धा मुंबई येथील प्रसिद्ध बी के एस ऍकॅडमीने आयोजित केली होती. या स्पर्धेसाठी भास्कर करकेरा आणि विजय कांबळे यांनी विशेष प्रयत्न केले. मुंबई उपनगर जिल्ह्याचे सचिव जयेश वेल्हाळ, ज्योती पगारे, दिनेश ढेरे, विशाल साळवे, सिद्धेश घाग, उषा शिर्के संतोष वाळुंज या सर्वांनी मिळून ही स्पर्धा उत्तम रित्या पार पडल्या या स्पर्ध मध्ये २०० स्पर्धक सहभागी झाले होते. निशाही परेल येथील चिल्ड्रन तायकोंडो अकॅडमी मध्ये प्रशिक्षण घेत आहे. मुंबई डिस्ट्रिक ज्युनियर अँड सीनियर कयोरुगी अँड पोम्से टायकोंडो चॅम्पियन शिप २०२१ ही मानाची स्पर्धा समजली जाते. निशा हिने या स्पर्धेमध्ये सुवर्णपदक मिळवून मोठे यश मिळवले आहे. निशा हिला चिल्ड्रन टायकांडो ॲकॅडमी चे मुख्य प्रशिक्षक सिद्धेश जाधव, संकेत भोसले, सुदेश पवार यांचे मार्गदर्शन लाभले तर प्रशालेच्या वतीने प्रिन्सिपल श्री वाळके सर,वर्ग शिक्षिका श्रीमतीआव्हाड मॅडम, स्पोर्ट्स शिक्षक कमलाकर रेड्डी सर, प्रकाश दांडेकर सर यांचे मार्गदर्शन लाभले.
या अगोदर निशा हिने विविध शालेय, जिल्हा, राज्य, आंतर राष्ट्रीय स्पर्धांमध्ये गोल्ड मेडल पटकावकी आहेत. अनेक नृत्य स्पर्धेमध्ये निशाने पदके पटकावली आहेत. निशा हिला अनेक मानाचे राज्य स्तरीय पुरस्कारही मिळालेले आहेत. महिला दशावतार कलाकार म्हणून सुद्धा निशा हिची ओळख आहे.तीला तिचे वडील प्रमोद सोलकर आणि आई पूजा सोलकर यांचेही मोलाचे मार्गदर्शन लाभले. अध्यक्ष नामदेव शिरगावकर यांचे यावेळी विशेष आभार मानले.निशा हिच्या यशाबद्दल मसुरे, रामगड येथून अभिनंदन होत आहे.