You are currently viewing चित्रपटगृहे होणार सुरु; प्रभारी जिल्हाधिकारी दत्तात्रय भडकवाड यांचे आदेश

चित्रपटगृहे होणार सुरु; प्रभारी जिल्हाधिकारी दत्तात्रय भडकवाड यांचे आदेश

सिंधुदुर्गनगरी

पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाकडील दि. 11 ऑक्टोबर 2021 रोजीच्या शासन निर्णयानुसार कोव्हिड 19 च्या पार्श्वभूमीवर राज्यातील चित्रपटगृहे दिनांक 28 ऑक्टोंबर 2021 पासून नियंत्रित स्वरुपात सुरु करण्यास शासनाने मान्यता दिली आहे. त्याअनुषंगाने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील चित्रपटगृहांविषयी निर्बंध शिथिल करुन सिंधुदुर्ग जिल्ह्यातील चित्रपटगृहे सुरु करण्यास मान्यता देणारे आदेश प्रभारी जिल्हाधिकारी दत्तात्रय भडकवाड यांनी दिले आहेत.

या आदेशात म्हटले आहे. कोव्हिड 19 च्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील चित्रपटगृहे सोबतच्या परिशिष्ट अ मधील मार्गदर्शक तत्वांच्या अधीन राहून नियंत्रित स्वरुपात सुरू करता येतील. ही परवानगी देण्यामागील शासनाचा उदात हेतू विचारात घेऊन जिल्ह्यातील चित्रपटगृहाचे परिचलन कोविड 19 संदर्भातील केंद्र शासनाच्या व राज्य शासनाच्या कोणत्याही निर्बंधाचा भंड होणार नाही अशा पद्धतीने करणे आवश्यक आहे. या मार्गदर्शक तत्वांचा भंग झाल्याचे निदर्शनास आल्यास संबधितांविरुद्ध नियमानुसार कारवाई करण्यात येईल. कोविड 19 विषाणूच्या प्रादुर्भावास प्रतिबंध करण्यासाठी शासनाने वेळोवेळी निर्गमित केलेल्या आदेशातील बंधनकारक असणाऱ्या सूचना या प्रकरणीही लागू राहतील.

परिशिष्ठ

शासन, पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाकडील अधिसूचना क्र.२०२०/प्र.क्र.६५/सां.का.१, दि.११/१०/२०२१ रोजीच्या आदेशासोबत ब्रेक द चेन अंतर्गत चित्रपटगृहे पुन्हा सुरु करण्याबाबतची प्रमाणित मानक कार्यप्रणाली (Standard Operating Procedure)

प्रमाणित कार्यचलन पध्दती

१. व्याप्ती :

१.१ कोविड-१९ च्या प्रसारास प्रतिबंध घालण्याच्या दृष्टीने, चित्रपटगृहामध्ये चित्रपट सादरीकरणाच्या दरम्यान निश्चितपणे अंमलात आणावयाच्या विनिर्दिष्ट उपाययोजनांबरोबरच, अंगीकारावयाच्या विविध सर्वसामान्य सावधगिरीच्या उपाययोजनाबाबतची प्रमाणित कार्यचलन या दस्तऐवजांमध्ये नमूद केलेली आहे.

१.२ प्रतिबंधित क्षेत्रात (Containment Zone) चित्रपटगृह पुन्हा सुरु करण्याकरिता परवानगी दिली जाणार नाही.

१.३ महाराष्ट्र शासनाचा महसूल व वन विभाग, आपत्ती व्यवस्थापन विभाग, मदत व पुनर्वसन विभाग तसेच सार्वजनिक आरोगय विभाग यांच्या प्रचलित मार्गदर्शक तत्वांनुसार चित्रपटगृहे नियमन केले जाईल.

 

२. चित्रपटगृहे पुन्हा सुरु करण्याबाबतची प्रमाणित कार्यचालन कार्यपध्दती :

२.१ महाराष्ट्र राज्यामध्ये चित्रपटगृहे पुन्हा सुरु करण्याबाबतची सर्वसाधारण मार्गदर्शक तत्वे :

सर्वसाधारण उपाययोजना – यामध्ये, कोविड-१९ च्या संसर्गाचा धोका कमी व्हावा याकरिता अनुसरावयाच्या सार्वजनिक आरोग्यविषयक उपाययोजनांचा समावेश होतो. या उपाययोजनांचे सर्वांनी (कर्मचारी तसेच भेटी देणारे) नेहमीच पालन करणे आवश्यक आहे.

या उपाययोजनांमध्ये पुढील बाबींचा अंतर्भाव आहे.

१. प्रेक्षागाराबाहेर, सामाईक क्षेत्रांमध्ये आणि प्रतीक्षा क्षेत्रांमध्ये नेहमी किमान सहा फूट इतके पर्याप्त सुरक्षित अंतर राखावे.

२. नेहमी तोंडाला मुखपट्टी (मास्क्) बांधणे / कपड्याने तोंड झाकणे (मुखावरण लावणे) अनिवार्य आहे.

३. परिवास्तूच्या प्रवेशाच्या व निर्गमनाच्या मार्गावर तसेच सामाईक क्षेत्रांमध्ये, हात स्वच्छ करण्यासाठी, हाताचा – स्पर्शरहित पध्दतीने घेता येणारे निर्जंतुक द्रव उपलब्ध ठेवावे.

४. श्वसनविषयक शिष्टाचाराने काटेकोरपणे पालन करण्यात यावे. खोकताना / शिंकताना प्रत्येकाने स्वत:चे तोंड व नाक टिप कागदाने (टिश्यु पेपर) / हात रुमालाने / कोपराने पूर्णपणे झाकून घेणे आणि वापरलेल्या टिप कागदाची (टिश्यु पेपर) योग्य प्रकारे विल्हेवाट लावणे आवश्यक आहे.

५. सर्वांनी स्वत:च्या आरोग्याची स्वत:च देखरेख करावी आणि कोणत्याही आजाराबाबत तात्काळ राज्य व जिल्हा मदत क्रमांकांवर (हेल्पलाईन) कळवावे.

६. थुंकण्यास सक्त मनाई असेल.

७. आरोग्य सेतू सुरक्षित स्थिती दर्शविणारे सर्व अभ्यागतांसाठी प्रवेश अनिवार्य असेल तसेच पर्यायी म्हणून अभ्यागत कोविड लसीकरण झाल्याचे अंतिम प्रमाणपत्र देखील दाखवू शकतात.

८. सर्व कर्मचारी जसे फुड कोर्ट / वापरकर्ते/साफसफाई सेवांमध्ये कार्यरत वर्गाचे संपूर्ण कोविड प्रतिबंधक लसीकरण (दोन डोस व दुसऱ्या डोस नंतर १४ दिवसांचा कालावधी पूर्ण झालेला असणे आवश्यक असेल.) झालेले असणे आवश्यक असेल.

९. शॉपिंग मॉलमध्ये लसीकरण पूर्ण झालेल्या व्यक्तींनाच प्रवेश अनुज्ञेय असला तरी अशा मॉलमध्ये असणाऱ्या मल्टीप्लेक्स मध्ये चित्रपटाच्या तिकिटावर आधारित प्रवेश अनुज्ञेय राहील.

 

२.२ प्रवेश व निर्गमन द्वारे :

अ. प्रवेश द्वारावर कर्मचाऱ्यांची/ भेटी देणाऱ्यांची तापमान तपासणी करण्यात यावी. लक्षणे नसलेल्या व्यक्तींनाच केवळ परिवास्तूत प्रवेश करण्याची मुभा देण्यात येईल.

ब. सर्व प्रवेश द्वारांवर आणि कार्यक्षेत्रामध्ये हात निर्जंतुक करण्याची सोय उपलब्ध करण्यात यावी.

क. प्रेक्षागाराच्या आणि परिवास्तूच्या प्रवेशाच्या आणि निर्गमनाच्या ठिकाणी प्रेक्षकाकरिता रांगेसाठी आखीव खुणा करण्यात येतील.

ड. गर्दी होऊ नये म्हणून लोकांना एकमेकांमध्ये अंतर ठेवून रांगेने बाहेर सोडण्यात यावे.

इ. एखाद्या मल्टिप्लेक्समध्ये विविध पडद्यांवर तसेच एकल पडद्यावर लागोपाठच्या प्रदर्शनाच्यामध्ये पुरेसा कालावधी ठेवण्यात येईल, जेणेकरून प्रेक्षक रांगेतून, एकमेकांमध्ये अंतर ठेवून आत जाण्याची व बाहेर पडण्याची सुनिश्चिती करता येईल.

२.३ आसन व्यवस्था :

अ. चित्रपटगृहाचा वापर त्यांच्या एकूण आसन क्षमतेच्या ५० टक्क्यांपेक्षा अधिक करण्यात येणार नाही.

ब. चित्रपटगृहाच्या प्रेक्षागारामधील आसन व्यवस्था ही पर्याप्त सुरक्षित अंतर राखले जाईल अशा प्रकारे केली असली पाहिजे.

क. तिकीट आरक्षणाच्या वेळी (ऑनलाईन आरक्षणाच्या आणि तिकीट खिडकीवरील तिकिटांच्या विक्रीच्या अशा दोन्ही वेळी), जी आसने वापरावयाची नसतील त्यावर ” आसनांचा वापर करू नये अशी स्पष्ट खुण करण्यात येईल.

टीप :- चित्रपटगृहामध्ये ” आसनांचा वापर करू नये ” अशी खूण केलेल्या आसनांचा लोकांनी वापर करू नये म्हणून त्यांवर एकतर फित लावण्यात येईल किंवा फ्लोरोसेंट मार्करने खूण करण्यात येईल, जेणेकरून नेहमीच पर्याप्त सुरक्षित अंतराची सुनिश्चिती होईल.

२.४ सुरक्षित अंतराबाबतची मानके :

अ. वाहनतळ परिसरातील आणि परिवास्तूच्या बाहेरील गर्दीचे योग्य व्यवस्थापन करताना,सुरक्षित अंतराबाबतच्या मानकांचे यथायोग्यपणे पालन केले जात असल्याची सुनिश्चिती करण्यात येईल.

ब. उद्वाहनांमध्ये सुरक्षित अंतराबाबतच्या मानकांचे यथायोग्यपणे पालन करून लोकांची संख्या मर्यादित ठेवण्यात येईल.

क. मध्यंतरामध्ये सामाईक जागा, वरांडे (लॉबी) आणि प्रसाधनगृहे या ठिकाणी गर्दी होऊ नये याची दक्षता घेतली पाहिजे. प्रेक्षकांनी मध्यतरामध्ये ये-जा करणे टाळावे याकरिता, त्यांना प्रोत्साहित करण्यात यावे. प्रेक्षागारातील वेगवेगळ्या रांगांमध्ये बसलेल्या प्रेक्षकांना एकमेकांमध्ये अंतर राखून ये-जा करता यावी याकरिता दीर्घकाळाचे मध्यंतर ठेवता येईल.

 

२.५ शो चे वेळ व स्टेजर्ड :

अ. एकाधिक स्क्रीनसाठी गर्दी टाळण्यासाठी शोच्या वेळा वेगवेगळ्या पाळल्या

प्रतिक्रिया व्यक्त करा