You are currently viewing प्रक्रिया पूर्ण न करता छत्रपती शिवाजी महाराज पुतळा भूमिपूजन

प्रक्रिया पूर्ण न करता छत्रपती शिवाजी महाराज पुतळा भूमिपूजन

माजी खा निलेश राणे यांनी चौकशी करणे होते गरजेचे; सेनेच्या नगरसेविका अनारोजीन लोबो यांचा आरोप

सावंतवाडी

शहरात भोसले उद्यानात होणारा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्या बाबत कोणत्याही प्रकारची लीगल प्रोसेस न करता माजी खासदार निलेश राणे यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्याची उंची, त्याचा रंग, वजन किती असणार आहे. याबाबत देखील कोणतीही प्रोसेस झाली नाही. माजी खासदार निलेश राणे यांनी भूमिपूजन करण्यापूर्वी याबाबत चौकशी करणे गरजेचे होते असे मत ज्येष्ठ नगरसेविका अनारोजिन लोबो यांनी आयोजित पत्रकार परिषद व्यक्त केले आहे.

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे राजकारण करून जनतेच्या डोळ्यात धूळफेक करत असल्याचा आरोप देखील त्यांनी यावेळी केला आहे. अश्वारूढ पुतळा सावंतवाडी शहरात व्हावा आणि तो भव्य दिव्य व्हावा असे आमचे देखील मत आहे. परंतु, हा पुतळा सर्व अटी शर्ती पूर्ण करून व्हावा असे मत व्यक्त केले आहे.

यावेळी नगरसेवक जयेंद्र परुळेकर, नगरसेवक सुरेंद्र बांदेकर, नगरसेवक बाबू कुडतरकर, नगरसेवीका शुभांगी सुकी, नगरसेवीका भारती मोरे, नगरसेवीका दिपाली सावंत, नगरसेवीका माधुरी वाडकर, आदी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा