You are currently viewing वेंगुर्ला तालुक्यात पावसाचे द्विशतक…

वेंगुर्ला तालुक्यात पावसाचे द्विशतक…

सर्वाधिक 264 मि.मी. पावसाची नोंद

सिंधुदुर्गनगरी : 

गेल्या चोवीस तासात वेंगुर्ला तालुक्यात मुसळधार पाऊस झाला असून 264.40मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. मालवण तालुक्यातही पावसाने द्विशतक केले असून कुडाळ आणि दोडामार्ग तालुक्यातल पावसाने एका दिवसात शंभरी पार केली आहे. तर जिल्ह्यात गेल्या चोवीस तासात सरासरी 137 मि.मी. पाऊस झाला आहे. आतापर्यंत जिल्ह्यात एकुण 4444.194 मि.मी इतका सरासरी पाऊस झाला आहे. तालुका निहाय पावसाची आकडेवारी पुढील प्रमाणे आहे. सर्व आकडे मिलीमीटर परिमाणात असून कंसातील आकडे आतापर्यंतच्या एकूण पावसाचे आहेत.

       दोडामार्ग – 145 (4718), सावंतवाडी – 90 (4865), वेंगुर्ला – 264.40 (4387), कुडाळ – 140 (4307.55) मालवण – 254 (5506), कणकवली – 67 (4003), देवगड – 98 (3564), वैभववाडी – 45 (4203) या प्रमाणे पाऊस झाला आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा