जनतेने एकत्र येत जनजागृती करण्याची गरज
सावंतवाडी
शहरात काल घटलेली घटना ही दुर्देवी असून, या घटनेने संपूर्ण सावंतवाडी शहरासह तालुका हादरून गेला आहे. यापूर्वी अशा प्रकारच्या घटना शहरात कधीच घडल्या नव्हत्या. यावेळी शहरातील नागरिकांशी शिवसेनेच्या वरिष्ठांनी संवाद साधला असता, शहरात अवैध धंद्यांना उत आला असून, तरूण या व्यवसायाकडे ओढले जात आहे. त्याच पार्श्वभूमीवर शहरातील जनतेने एकत्र येऊन जनजागृती रॅली काढली पाहिजे. असे आव्हान शिवसेना तालुका प्रमुख रुपेश राऊळ यांनी आयोजित पत्रकार परिषदेत केले आहे.
यावेळी जेष्ठ नगरसेवीका आनोरोजीन लोबो, नगरसेवक सुरेंद्र बांदेकर, माजी नगरसेवक संजय पेडणेकर, माजी नगरसेवक सुरेश भोगटे, अशोक दळवी, योगेश नाईक आदी उपस्थित होते