You are currently viewing पणत्या घ्या पणत्या

पणत्या घ्या पणत्या

  • Post category:इतर
  • Post comments:1 Comment

जागतिक मराठी “साहित्य कला व्यक्ती” विकास मंचच्या सदस्या, विविध पुरस्कार प्राप्त जेष्ठ कवयित्री प्रा.सौ. सुमती पवार यांची काव्यरचना

पणत्या घ्या पणत्या दिवे आजीचे घ्यावे…
तिला दोन घास मिळू द्यावे…
वय झालेले तरी ही करते काम
कष्टाला द्यावा मान …

आर्जवे ती रस्त्यावरती
बाजूला दगड नि माती
नशिबी कष्ट,वय तिचे पहावे
पहा दिवे तिचे उजळावे ….
दीप आजीचे हो घ्यावे…..

चेहऱ्यावर ना लाचारी
जगण्याची दिसे उभारी
मनी अभिमान दिसे धडपड
गरजू आहे , मदतीचे हात हो द्यावे
दीप फक्त आजीचे घ्यावे ..

भीक मागती ना, सावरण्या
नको पहा तिच्या विनवण्या
अंगणी तिच्या,आपण दीप लावावे
दीप फक्त आजीचे घ्यावे….

प्रा.सौ.सुमती पवार,नाशिक
(९७६३६०५६४२)

This Post Has One Comment

  1. Sujata Yeole

    सुंदर भावपूर्ण रचना

प्रतिक्रिया व्यक्त करा