You are currently viewing कणकवली राष्ट्रीय काँग्रेसच्यावतीने पंतप्रधान इंदिरा गांधी यांची पुण्यतिथी आणि सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती साजरी

कणकवली राष्ट्रीय काँग्रेसच्यावतीने पंतप्रधान इंदिरा गांधी यांची पुण्यतिथी आणि सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती साजरी

कणकवली

राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या वतीने कणकवली तालुका कार्यालय येथे भारत देशाच्या पहिल्या महिला पंतप्रधान इंदिरा गांधी यांची पुण्यतिथी आणी पोलादी पुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती साजरी करण्यात आली यावेळी तालुका अध्यक्ष प्रदीप मांजरेकर, शहर अध्यक्ष महेश तेली, सांकृतिक विभाग जिल्हा अध्यक्ष प्रवीण वरुणकर, प्रदिप कुमार जाधव, जेष्ठ कार्यकर्ते नादिरशहा पटेल ,उपाध्यक्ष तालुका कॉंग्रेस, श्री राजेंद्र मनोहर पेडणेकर-,जेष्ठ कार्यकर्ते आणि सामाजिक कार्यकर्ते, कमलाकर तांबे सांकृतिक विभाग कणकवली तालुका अध्यक्ष, श्री अजु मोर्ये यावेळी राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ कार्यकर्ते श्री राजेंद्र मनोहर पेडणेकर यांनी आपले विचार मांडले, आज देशाला स्वर्गीय इंदिरा गांधी आणि सरदार वल्लभभाई पटेल यांच्या सारख्या कणखर नेतृवाची गरज निर्माण झाली आहे.
इंदिरा गांधी यांनी स्वातंत्र्य लढ्यात लहानपणी च वानर सेना निर्माण करुन सहभागी झाल्या ,पाकिस्तान चे दोन तुकडे करून बांगलादेश ची निर्मिती केली .खलिस्तान सारखा विषय सुध्दा खंबीर पणे हाताळला .
त्या मुळेच त्यांना भारत देशा करीता सर्वोच्च बलिदान दिले .सरदार वल्लभभाई पटेल यांनी देशातील संस्थाने खालसा करण्याचा कठोर निर्णय घेतला .आज कॉंग्रेस पक्षाचे विचार जनमानसात पोहचवून, पुन्हा एकदा देशात राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे सरकार आणलेच पाहिजे तर आणि तरच भारत देशाला चांगले दिवस येतील . त्यामुळे सर्व कार्यकर्त्यांनी आतापासूनच कामाला लागले पाहिजे असे आवाहन करण्यात आले.

प्रतिक्रिया व्यक्त करा