कणकवली
शहरात रेल्वे स्टेशन परिसरात सुरू असलेल्या 3 पानी जुगारावर पोलिसांनी छापा घातला आहे. 20 हजार 800 रुपयांच्या रोख रकमेसह एक मोबाईल जप्त केला.सोमवारी 21 सप्टेंबर रोजी 3 पानी जुगार सुरू असल्याची निनावी फोन द्वारे कणकवली पोलिसांना कोणीतरी टीप दिली होती.त्यानुसार पोलिस निरीक्षक शिवाजी कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक जंबाजी भोसले, महिला पोलीस हवालदार ममता जाधव, कॉन्स्टेबल किरण मेथे, चालक कॉन्स्टेबल माने यांच्या पथकाने सुरू असलेल्या जुगारावर छापा टाकला. या छाप्यात चौघे आरोपी 3 पानी जुगार खेळताना रंगेहाथ सापडले. सोमवारी रात्री पावणेनऊच्या सुमारास कारवाई करण्यात आली. यात मुख्य आरोपी प्रकाश शिंदे उर्फ सावकार(रा. कणकवली) यांच्यासह नारायण आंगणे (रा. गोठणे ता.मालवण) यश घाडीगावकर ( रा. बांधकरवाडी, कणकवली)सूरज सुर्वे (रा.परबवाडी, कणकवली) या चौकडीला ताब्यात घेतले आहे. चौघांवर ही गुन्हा दाखल केला असून अधिक तपास महिला पोलिस हवालदार ममता जाधव करत आहेत.