देवगड
देवगड जामसंडे शहराकरिता स्वतंत्र नळ पाणी योजना यासाठी देवगड तालुका राष्ट्रीय काँग्रेसच्या वतीने तालुकाध्यक्ष उल्हास मणचेकर यांनी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांची भेट घेऊन त्यांना निवेदन सादर केले या निवेदनात करणेबाबत…देवगड जामसंडे शहराचा होणारा विस्तार व गरज पाहता देवगड जामसंडे शहराकरिता स्वतंत्र नळपाणी योजना होणे आवश्यक आहे. सध्यस्थितीमध्ये देवगड जामसंडे शहर व बहुतांश वाड्यांना प्रादेशिक
नळ पाणी योजनेद्वारे पाणी पुरवठा केला जात आहे. सदर पाणी पुरवठा हा एक दिवस आड प्रसंगी अपुऱ्या प्रमाणात केला जात आहे. तसेच देवगड शहराचा भौगोलिक विचार करता बहुतांश लोकवस्ती ही किनारपट्टीलगत असल्याने तेथील विहिरी या खाऱ्या पाण्याच्या असल्याने त्याचे पाणी पिण्यायोग्य नाही. व
उर्वरित भागामध्ये सार्वजनिक विहिरी उपलब्ध नाही. त्यामुळे प्रादेशिक नळ पाणी योजनेवरच सर्व जनतेला अवलंबून राहावे लागते. प्रादेशिक नळ पाणी योजना ही फार जुनी असल्याने वारंवार नादुरुस्त होते. त्यामुळे बऱ्याचदा पाणी पुरवठा खंडित होतो. उन्हाळ्यामध्ये पाण्याची पातळी कमी झाल्यास पाणी टंचाईलाही सामोरे जावे लागते. एकंदरीत या सर्व परिस्थितीचा विचार करता देवगड जामसंडे शहराला स्वतंत्र नळ पाणी योजना मंजूर करणे आवश्यक आहे. त्यासाठी आपण प्रयत्न करावे अशा आशयाचे निवेदन देवगड तालुका राष्ट्रीय काँग्रेसच्या वतीने जलसंपदामंत्री जयंत पाटील यांना देण्यात आले. यावेळी युवक काँग्रेसची जिल्हा कार्याध्यक्ष किरण टेंबुलकर सुरेश देवगडकर, सुरज घाडी,कुलकर्णी व सुगंधा साटम आदी उपस्थित होते