जागतिक मराठी “साहित्य कला व्यक्ती” विकास मंचच्या सदस्या, विविध पुरस्कार प्राप्त जेष्ठ कवयित्री प्रा.सौ. सुमती पवार यांची काव्यरचना
तुझ्या आठवांनी मी घायाळ आहे
वाटते कधी ही काळरात्र आहे …
तुझ्या आठवांनी मी ….
कळ्यांनी दिल्या कधी दवबिंदू माळा
ओघळून मोती सुना माळ आहे …
तुझ्या आठवांनी मी …
दिसे चंद्र गोरा परी काळी छाया
फसवीच नाती कुठे नाळ आहे …
तुझ्या आठवांनी मी…
नक्षत्रे फसवी किती दूर दूर
मृगजळ सारे जाळच आहे
तुझ्या आठवांनी मी ….
गळा मौक्तिकांच्या पडतील माळा
हर एक स्वप्न पाहतोच आहे
तुझ्या आठवांनी मी …
नको स्वप्न माला नको पाहणे ते
बरा पाठीशी हा जंजाळ आहे
तुझ्या आठवांनी मी ….
सुखाच्या सरींची मनी आस आहे
वाटते कधी हा उगा फास आहे
तुझ्या आठवांनी मी…..
गुंतू नये हे जरी आहे सत्य
जगणे तरी ही जीवापाड आहे
तुझ्या आठवांनी मी ….
घा..या…ळ…आहे ….
प्रा.सौ.सुमती पवार नाशिक
(९७६३६०५६४२)