लेख: अहमद मुंडे
माणसाच्या मूलभूत गरजा अन्न वस्त्र निवारा असतांत. मानवाला हे सर्व जिथे मिळेल तिथे त्याचे एक विशवच निर्माण होते. आपल्या देशात दिवसेंदिवस वाढत चालले कुपोषण उपासमारी. हा आपल्याला लागेला सर्वात मोठा शाप आहे. लोकांना सकस आहार. स्वच्छ पाणी वाढती लोकसंख्या वाढती बेरोजगारी. गरिबी यामुळे वाढते अशिक्षित. यामुळे आणि शासनाच्या अधिकारी व कर्मचारी यांच्या कामचुकार पणा मुळे. सापेक्ष सर्वे न झाल्यामुळे. # श्रीमंत तुपाशी आणि गरिब उपाशी # असा सर्रास प्रकार आपणांस दिसतो. आणि या अधिकारी व कर्मचारी यांच्या मुळे गोरगरीब जनतेला जीवनावश्यक सेवा सुविधा यांना पारखे व्हावे लागते
अन्न भेसळ हा आपणास माहीत असलेला दिवसाढवळ्या चालणारा प्रकार आहे. रेशन मधून येणारे अन्न धान्य काय दर्जाचे असतें शासन म्हणतंय सर्वांना निवडक आणि स्वच्छ अन्न धान्य मिळाले पाहिजे मग आज रेशनला येणारे अन्न धान्य किडलेले कुजके. किडे मुंग्या भुंगे पाऊडर मिश्रीत. खडे. भुसा खाण्यास अयोग्य भेसळयुक्त अन्न धान्य वितरण कसे केले जाते कारणं रेशनला येणारे अन्न धान्य गोरगरीब पोटाची खळगी भरण्यासाठी खातात. हे रेशन अन्न धान्य कोणताही अधिकारी खात नाही. आपण मूर्ख आहोत म्हणे आपण लोकशाही राज्यात आहोत म्हणून आमच्या युनियनने अन्न व नागरी पुरवठा विभाग यांचेकडे शासकीय गोदाम तपासणी पडताळणी करण्याचा अधिकार मागितला होता. त्यांनी तो नाकारला आणि त्यासाठी सखोल असे कारणं दिले नाही. म्हणजे आपण आपल्या कल्याणासाठी निवडणून दिलेले मंत्री. हेच वरूनच रेशन अन्न धान्य मध्ये भेसळ करत नसतील काय ? प्रश्न आहे तो मोठा ? पण जनतेतील लोकशाही संपली आणि हुकूमशाही आली तुम्हाला मतदान करण्याचा अधिकार आहे पण विचारणा करण्याचा नाही म्हणजे भेसळ वरूनच होत आहे आणि शिल्लक राहिले ते गाव तालुका जिल्हा राज्य देश. यामधील शासकीय चोरांनी खाल्लं
जागोजागी शेतकरी यांच्याकडून दुध खरेदी करून त्याच दुधापासून केमिकल करून विविध पदार्थ जसे. दही ताक. लोणी व तूप दुध पाऊडर पणीर खवा. आम्रखंड श्रीखंड बासुंदी असे जीवनावश्यक घटक काढून घेवून शिल्लक राहणारे सकस विरहित दुध विविध नांवाने बाजारात विक्रीसाठी आणलें जाते त्यात सकस असे काहीच बाकी नसते लोकांच्या जिभेला चव आणण्यासाठी विविध केमिकलचा लोकांच्या शरिराला घातक असणारे असे विविध केमिकल पदार्थ वापरले जातात आणि बाजारांत तोंडाला येईल. पॅकिंग वर बेमाफी किंमत छापून विकले जातात यामध्ये होणारी भेसळ रोखण्यासाठी कोणताही. अन्न व औषध प्रशासन विभाग कधी गेला आहे कां ? त्याचा रिपोर्ट जगजाहीर केला आहे का ? नाही कारण तो किंवा सर्वच चालणारे दुधसंघ हे कोणत्यातरी नेत्यांचे असतांत पण लोकांच्या जीवनाचे काय ? दुध पिशवी. व अन्य दुग्धजन्य पदार्थ यांच्यावरील पॅकिंग तारीख आपण कधी चेक केली आहे का ?
आपल्याला खाण्यास भुरळ पाडणारे बेकरी पदार्थ. स्विटमारट. व विविध थंड पेये. ज्युस बार. असे एक नाही अनेक खाद्यपदार्थ तयार करणारी व विक्री करणारी दुकानें आज बाजारात चालत आहेत. बेकरी पदार्थ पाव बटर. केक. अशी विविध उत्पादने की जी आपण रोजच्या जीवनात आहारात वापरतो पण आपण कधी सखोल चौकशी विचार केलाच नाही. हे सर्व पदार्थ तयार करण्यासाठी वापरण्यात येणारा कच्चा माल त्याचा दर्जा काय आहे. वापरला जाणार मैदा कसल्या गहू पासून बनविला आहे. वापरले जाणारे तेल कसल होत ? बेकरी उत्पादन करणार्या कंपनीत काम करणारे कामगार यांची सवयी बिडि सिगारेट मावा गुटखा असे विविध नशेचे पदार्थ सेवन करणारे विविध आजाराने ग्रस्त असतात. ते थुंकने. किंवा अन्य काही करत असतील का? कारण आपण बघायलाच नाही ? विचार करायलाच नको. ? पायाने पिट तुडवने. म्हणजे किती भेसळ आहे. कोणी अन्न व औषध प्रशासन विभागाचे अधिकारी व कर्मचारी यांनी तपासणी पडताळणी केल्याचे जगजाहीर केल का ? तपासणी पडताळणी केली का ते आधी बघा ? विविध शहरांतील चौका चौकात संध्याकाळी घरची सर्वजण एकत्र बसून. ज्युस आईस्क्रीम विविध क्रिमरोल जे आगोदरच पॅक करून ठेवलेले असतात. विविध पेये जी फळांपासून व दुधापासून व विविध केमिकल मानवाच्या जीवाला बाधक असणारे विविध कलर ज्युस साठी लागणारे साहित्य फळें मार्केटमधून. लागलेली. नासकी कुजकी. खाण्यास योग्य नसलेली अशी फळें वापरली जातात. दुधात ५० टक्के चया वर पाणी वापरले जाते. विविध केमिकल जी मानसाच्या जीभेला चव निर्माण करतात अशी घातक केमिकल जी मानवाला तात्पुरते समाधान आणि एकादा रोग जडून जातो. आज अन्न व औषध प्रशासन विभाग यांनी जागोजागी गैरप्रकार रोखण्यासाठी धाडी टाकणे गरजेचे आहे.
सर्वात मोठी भेसळ होती ती म्हणजे. वडापाव. चायनीज. भेळ पाणीपुरी. रगडा पॅटीस. बिर्याणी हाऊस. हाॅटेल. धाबे. नाष्टा सेंटर. चहा कॉफी. असे विविध खाद्यपदार्थ विक्री करणारे हात गाडे. यावर. यात प्रामुख्याने वापरला जाणार कच्चा माल. म्हणजे. खराब कांदा बटाटा. बेसन ऐवजी मका पिट. खराब मिरची कोथिंबीर. आणि सर्वात मोठी भेसळ म्हणजे ज्या तेलात हे खाद्यपदार्थ तळले जातात ते तेल पंधरा पंधरा दिवस बदलले जात नाही. त्यातच हे सर्व खाद्यपदार्थ तळले जातात त्यामुळे लोकांना विष बाधा होण्याचा धोका जास्त आहे. सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे यांवर काम करणारे कामगार यांचे आरोग्य हा सर्वात मोठा जटील प्रश्न आहे कारण. अन्न व औषध प्रशासन ज्यावेळी खाद्यपदार्थ विक्री करण्याचे परवाने देते तेव्हा. स्वच्छता. स्वच्छ पाणी. खाद्यपदार्थ झाकून ठेवून विकणे जाळी आवरण करणे कामगार डोकयाला कॅप. हातमोजे. बुट. उच्च दर्जाचे खाद्यपदार्थ विक्री करणे. भेसळ विरहीत अन्न विकणे. असे एक नाही अनेक अटी व शर्ती अधिन ठेवून खाद्यपदार्थ विक्री करण्यासाठी परवाने देते आज खरोखरच अस होत का ? ग्रामपंचायत नगरपालिका महानगरपालिका यांनी सुध्दा खाद्यपदार्थ विक्री करणारे व खाद्यपदार्थ दर्जा तपासणी पडताळणी करण्यासाठी मोहीम राबविण्याच्या गरज आहे कोणीही करत नाही ? कोणालाही आपल्या व जनतेच्या जीवांची फिकीर नाही ? आत्ता आपणच पुढे येण्याची गरज आहे
आली दिवाळी सोन्याच्या पाऊलानी. आनंद खुशहाली. समाधान. अंधारातून प्रकाशाकडे वाटचाल करण्याचा संदेश यामधून दिला जातो. लक्ष्मी पूजन. दिवाळी पाडवा. भाऊबीज. बलीप्रतिपदा. तुळशी बारस लग्न. अस नियोजन असत दिवाळीचं साबन उठन सुवासिक तेल. नविन कपडे सगेसोयरे मित्रपरिवार नातेवाईक मित्र यांच्या गाठीभेटी आणि मग सर्वांचे तोंड गोड करण्याची आपली परंपरा. पहिल्या काळात लोकांच्या जवळ वेळ होता स्वता आपल्या समोर खरेदी माल करून दिवाळीसाठी लागणारे विविध पदार्थ घरच्या घरी तयार केले जात होते. आज वेळ नाही मग काय जागोजागी दिवाळी फराळासाठी लागणारे. लाडू चकल्या करंज्या चिवडा शेव काफनया. अनारसे. बुंदी लाडू. रवा लाडू. असे विविध खाद्यपदार्थ विक्री करणार्या चे सटाॅल. आगोदरच तयार असतात मग काय केव्हा करायचं म्हणून आपण केव्हा तयार केलंय. ? कोणत्या तेलात केलंय. ? विविध कोणते कलर घातले आहेत ? चटणी पुड त्यात कोणता कलर आहे ? साखरेत सॅकरिन किती पटित आहे. ? रवा मैदा कोणत्या दर्जाचा आहे ? दिवाळी फराळ तयार करताना त्यावर किती धुळ बसली. किती घातक माश्या किटक बसले ? दिवाळी तयार करणारे कामगार यांचे आरोग्य कसे होते ? त्याने स्वच्छता पाळली असेल का ? स्वच्छ पाणी वापरले असेल का ? असे विविध प्रश्न आहेत की त्यांचा आपण कधी विचारच केला नाही कारण आम्हाला तेवढा वेळ नाही म्हणजे जाणूनबुजून आम्ही भेसळयुक्त खाद्यपदार्थ घरी आणतो आणि सोबत विविध पोटाचे विकार. घसा विकार. असे विविध विकार पैसे देऊन विकत घरला आणतो. जनता जरी खुळी आहे पण आपल्या शासनाने अन्न व औषध प्रशासन विभाग प्रत्येक जिल्ह्यात एक विभाग नेमला आहे पण तो अशा सणासुदीच्या काळात आपल्या पदांचा अधिकारांचा जनहितासाठी वापर करतो का ? आपल्या पदाचा अधिकारांचा किराणा दुकानदार यांना आपल्या फायद्यासाठी दम दिला जातो काय ? ऐवढ एवढ द्या असा प्रकार आहे कां ?
दिवाळी सण साजरा करताना काही सावधानता बाळगा. फटाके लहान मुलांच्या हातात देऊ नका. घराजवळ आजारी वयोवृद्ध व्यक्ती असतील तर फटाके फोडू नका. कसलीही इजा होईल असा प्रकार करू नका. कारणं दिवाळी सण साजरा करताना कोरोना महामारी संकटांचे भय मनांत ठेव. गेल्या वर्षी आपल्याला दिवाळी साजरी करण्याचा योग नव्हता कारणं कोरोना महाभयंकर संकट आपल्यावर होतें. आज दिवाळी साजरी करताना आपल्या गावात तालुका जिल्हा राज्य देश एवढेच काय आपल्या घराजवळ कोरोना काळात. आई वडील गमावलेली कोणी मुल आहेत का. ? पती गमावलेली कोणी अभागी महिला आहे का ? भाऊ बहिण गमावलेली कोणी व्यक्ति आहे का ? आपली पत्नी कोरोना काळात गमावलेली कोणी व्यक्ति आहे का ? आपल्या सगेसोयरे मित्रपरिवार नातेवाईक मित्र गमावलेली कोणी लोक आहेत कां ? त्यांच्या सुध्दा दुःखात सहभागी व्हा. त्याचं सुध्दा तोंड गोड करा कोरोना सारख्या महाभयंकर महामारी संकटाने आलेल्या परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी त्यांना धीर द्या. फटाके फोडणे म्हणूजे आनंद व्यक्त करणे तसा आत्ता काळ नाही एकामेकाला मदत करा. माझ्या घरात दिवाळी आहे शेजार यांच्या. घरात दिवाळी आहे का ? त्यांच्यात चूल पेटली आहे का ? सर्वांच्या सुखात दुःखात सहभागी होणे यासाठी भारतीय संस्कृतीत सण ही संकल्पना आहे
भेसळ पासून वाचा. कोणताही खाद्यपदार्थ पारखून घ्या…
समाजसेवा बंद आंदोलन मोर्चा उपोषण रस्ता रोको आंदोलन निवेदन तक्रार अर्ज मागणी अर्ज प्रचार प्रसार प्रसिध्दी जाहिरात वाचन लेखन संबोधन प्रबोधन आणि मग नेतृत्व करण्यासाठी
बांधकाम कामगार व इतर श्रमजीवी कर्मचारी युनियन इस्लामपूर
रुग्ण हक्क व अधिकार समिती सांगली जिल्हा
रेशन अधिनियम कायदा २०१३ रक्षक समिती सांगली जिल्हा
मौलाना आझाद विचार मंच सांगली जिल्हा
माहिती अधिकार नियोजन समिती सांगली जिल्हा
संस्थापक अध्यक्ष अहमद नबीलाल मुंडे
९८९०८२५८५९