सिंधुदुर्गनगरी
जिल्हा पोलीस दलाच्या आस्थआपनेवरून सेवानिवृत्त झालेल्या पोलीस अंमलदारांकरिता दि. 25 ऑक्टोबर रोजी जिल्हा पोलीस अधिक्षक कार्यालयात पेन्शन अदालतीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पोलीस अधिक्षक राजेंद्र दाभाडे, उपविभागीय पोलीस अधिकारी, कणकवली, पोलीस उप अधिक्षक, मुख्यालय, मंत्रालयीन अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. या पेन्शन अदालतीसाठी 86 सेवानिवृत्त पोलीस अंमलदार उपस्थित होते.
यावेळी पेन्शन संदर्भातील विविध तक्रारींबाबत माहिती घेण्यात येऊन त्या अनुषंगाने सविस्तर माहिती पुरवून त्यांच्या शंकांचे निरसन करण्यात आले. सेवानिवृत्त अंमलदारांच्या सातव्या वेतन आयोगाच्या फरकाच्या दुसऱ्या हप्त्याची बिले ऑक्टोबर महिन्यात कोषागारात जमा करण्यात आल्याने 50 टक्के पेन्शनर्सचे प्रश्न सुटलेले आहेत. तसेच त्यांना पेन्शन संबंधी व इतर शासनाच्या विविध परिपत्रकांची माहिती देण्यात आली. यावेळी सेवानिवृत्ती धारकांच्या ओळखपत्रांचेही वाटप करण्यात आले.