You are currently viewing सिंधुदुर्ग जिल्ह्यात काँग्रेस सदस्य नोंदणीचा शुभारंभ…

सिंधुदुर्ग जिल्ह्यात काँग्रेस सदस्य नोंदणीचा शुभारंभ…

 जिल्हाध्यक्ष चंद्रकांत उर्फ बाळा गावडे

अखिल भारतीय काँग्रेस कमेटीने संपूर्ण देशात काँग्रेस सदस्य नोंदणी कार्यक्रमाचा सूचना दिलेल्या आहेत. सदर सूचनेनुसार महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष स नानाभाऊ पटोले यांनी संपूर्ण महाराष्ट्रात १ नोव्हेंबर रोजी सदस्य नोंदणी करण्याचे आदेश दिले आहेत.
स्वतः प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले १ नोव्हेंबरला गडचिरोली येथून सदर सदस्य नोंदणी अभियानाचा शुभारंभ करणार आहेत. सोमवारी कुडाळ येथे सदस्य नोंदणी अभियानाचा शुभारंभ करण्यात येणार आहे. केंद्र सरकारच्या चूकीचा, दिशाहीन, बेजबाबदार धोरणा मुळे देशाची अर्थव्यवस्था मोडकळीस आलेली आहे.. देशातील वाढती महागाई, वाढती बेरोजगारी या मुळे देशातील कष्टकरी ,कामकरी, छोटे उद्योजक, व्यापारी, नोकरदार, शेतकरी, महीला तरुण वर्ग जो खरा देशाचा आर्थिक कणा व भविष्य आहे तो आज पार भूईसपाट झाला आहे. देशात धार्मिक,धर्मा धर्मात जाती जातीत वाढती व्देष भावना, देशाच्या सर्वधर्मसमभाव व भारतीय घटना विरोधी धोरणे, सरकारी उद्योग व्यवसाय विक्री धोरण या सर्वां मुळे देशाची भविष्यात अतिशय हालाखीची,बिकट अवस्था निर्माण होण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. आज सात वर्षा नंतर देशातील जनतेला देशाचा,आपल्या स्वतःच्या, मुलाबाळांचा उज्ज्वल व सुरक्षित भविष्यासाठी काँग्रेसचीच गरज आहे याची जाणीव होत आहे. म्हणूनच काँग्रेस पक्ष देशात, महाराष्ट्रात, सिंधुदुर्ग जिल्ह्यात बळकट करत व देशाला गतवैभवाचे,भरभराटीचे दिवस परत देण्यासाठी काँग्रेस पक्ष जनतेचा शेवटच्या घटका पर्यंत पोचत हे पक्ष सदस्य अभियान जोरदारपणे राबवणार आहे.सदर अभियानात काँग्रेसचे जिल्हा पदाधिकारी, प्रदेश पदाधिकारी, सर्व विभाग व सेलचे अध्यक्ष, पदाधिकारी, लोकसभा व विधानसभा उमेदवार, सर्व तालुका अध्यक्ष ,पदाधिकारी यांनी आपल्या कार्यकत्यां सोबत दिनांक १ नोव्हेंबर रोजी सोमवारी कुडाळ येथे दुपारी २ वाजता उपस्थित रहावे….असे आवाहन सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेस अध्यक्ष चंद्रकांत उर्फ बाळा गावडे यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा