मालवण
मालवण कुडाळ मार्गावरील चौके पेट्रोल पंप पासून काही अंतरावर असलेल्या वळणावर मोटारसायकल व मासे वाहतूक करणारी बोलोरो यांच्यात शुक्रवारी सकाळी अपघात घडला. यात मोटारसायकल चालक अशोक धुळू जंगले (वय २३) मूळ बेळगाव, खानापूर येथील युवकांचा जागीच मृत्यू झाला.
मालवण येथे गवंडीकाम करणारा अशोक हा शुक्रवारी सकाळी मोटारसायकलने बेळगाव येथे गावी निघाला होता. या दरम्यान हा अपघात झाला.
मालवण पोलीस घटनास्थळी दाखल झाले. हेल्मेट असतानाही डोक्याला मार लागून रक्ताच्या थारोळ्यात पडलेला मृतदेह पंचनामा करून शवविच्छेदन साठी मालवण ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आला. अपघातग्रस्त दोन्ही वाहने मालवण पोलीस ठाण्यात नेण्यात आली असून जबाब नोंदणी व अधिक तपास सुरू असल्याची माहिती मालवण पोलीस ठाण्याचे पोलीस सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन नरळे यांनी दिली आहे.
अपघाताची खबर मिळताच चौके येथील व्यावसाईक संतोष गावडे, बी.जी.गावडे, संजय गावडे, हेमंत गावडे, शिवाजी गावडे, अमित चव्हाण, अजीत गावडे यांनी अपघातस्थळी धाव घेतली.
रस्त्याच्या दोन्ही बाजुला जवळपास एकतास वहातुक खोळंबली होती. मालवण पोलिस ठाणेचे सहा. पो. निरीक्षक नितीन नरळे, पोलिस नाईक डी. जानकर, एच व्ही पेडाणेकर, व्ही एच पाटिल यांनी पंचनामा केला. या प्रकरणी जबाब नोंद व अपघात नोंद बाबत मालवण पोलीस ठाण्यात पुढील कार्यवाही सुरू आहे.