You are currently viewing सुशांतच्या शरीरात केमिकल आढळले. . .

सुशांतच्या शरीरात केमिकल आढळले. . .

मुंबई  :

सुशांतच्या शरीरात आढळले केमिकल;व्हिसेरा रिपोर्ट अखेर समोर आला. बॉलिवूड अभिनेता सुशांतसिंह राजपूत याच्या आत्महत्येला तीन महिने उलटून गेले तरीही या प्रकरणाचा तपास अध्याप पूर्ण झालेला नाही. या प्रकरणाच्या तपासात महत्त्वाचा व्हिसेरा रिपोर्ट अखेर समोर आला.
त्यातून सुशांतच्या शरीरात केमिकलचे अंश असल्याचे समोर आले आहे. केमिकलमुळेच सुशांतचा मृत्यू झाला का, याचा तपास होणार आहे.

सुशांतने खरेच आत्महत्या केली की त्याची हत्या करण्यात आली होती?सुशांतने आत्महत्या केली नसून त्याची हत्याच करण्यात आली, असा आरोप सुरुवातीपासूनच एका गटाकडून करण्यात येत आहे. त्यातच सुशांतच्या शरीरात केमिकल असल्याचे समोर आल्याने संशय बळावला आहे.
एनसीबीकडून एकूण १० जणांना अटक करण्यात आलेली असून यामध्ये शौविक चक्रवर्ती, सुशांतचा हाऊस मॅनेजर सॅम्यूअल मिरांडा, त्याचा स्टाफ, दिपेश सावंत, ड्रग्स तस्कर यांचा समावेश आहे.
या अगोदर सुशांतसिंह आपली कोअर टीम तसेच बॉलिवूडमधील खास मित्र रिया चक्रवर्ती, सारा अली खान, श्रद्धा कपूर आणि अटक करण्यात आलेला ड्रग्स तस्कर संशयित झाईद आणि इतरांसोबत पार्टी करत होता, अशी माहिती एनसीबीला मिळाली होती.

प्रतिक्रिया व्यक्त करा