You are currently viewing अवैध विनापासी साग इमारती लाकूड वाहतूक जप्त

अवैध विनापासी साग इमारती लाकूड वाहतूक जप्त

अवैध लाकूड वाहतुक वनविभागाच्या रडारवर वनविभागाची मोठी कारवाई करण्यात आली. अवैध विनापासी साग इमारती लाकूड वाहतूक होत असताना जप्त करण्यात आले. २६ ऑक्टोबर रोजी रात्री ९.०० वाजताच्या सुमारास टाटा मॉडेल 2515 EX वाहन क्र. KA 28/8981 या कर्नाटक राज्यातील वाहनामधून *साग इमारती लाकडाची* विनापरवाना साळगाव ता. कुडाळ येथुन बेळगांवकडे वाहतूक होत असल्याबाबत गोपनीय  माहिती मिळाली. त्या नुसार वाहनाचा साळगाव ता. कुडाळ येथे अटकाव करून तपासणी केली असता अवैध *साग इमारती नग ११९/ ५१९ घनफुट माल* आढळून आला.

या प्रकरणी *इम्तियाज दस्तगीर मुजावर रा. चंदगड जि. कोल्हापूर* याच्यावर वनोपज लाकूड मालाची विनापरवाना विनापासी अवैध वाहतूक करून *भारतीय वन अधिनियम १९२७ चे कलम ४१ (2ब), महाराष्ट्र वन नियमवाली २०१४ चे नियम ३१, ८२* चे उल्लंघन केल्याने गुन्हा नोंद करण्यात आला. तसेच वाहतूकसाठी वापरण्यात आलेले *टाटा मॉडेल 2515 EX वाहन व साग इमारती लाकूड माल जप्त* करण्यात आला असून पुढील तपास चालू आहे.

यावेळी वनपरिक्षेत्र अधिकारी श्री. शिंदे म्हणाले, लाकूड मालाची विनापासी अवैध वाहतूक करणे. भारतीय वन अधिनियम १९२७ अन्वये प्रतिबंधित असून अशा अवैध वाहतुकीकरिता २ वर्षे पर्यंतच्या कारावासाची तसेच द्रव्यदंडाचीही तरदूत करणेत आलेली आहे. पुढे ते म्हणाले, अवैध लाकूड वाहतुकीवर आळा घालण्यासाठी वनविभागाने धडक कारवाई सुरू केली असून असा अवैध प्रकार दिसून आल्यास वनविभागास कळविण्याचे आवाहनही करण्यात आले.

सदर कारवाई उपवनसंरक्षक (प्रा.) सावंतवाडी श्री. शहाजी नारनवर व सहाय्यक वनसंरक्षक (खाकुतो व वन्यजीव) सावंतवाडी श्री. आय. डी. जालगावकर व वनपरिक्षेत्र अधिकारी, कुडाळ श्री. अमृत शिंदे यांचे मार्गदर्शनाखाली वनपाल माणगांव श्रीम. श्रेया परब , वनपाल नेरूर त हवेली धुळु कोळेकर, वनरक्षक माणगाव बाळराजे जगताप, वनरक्षक वाडोस सुर्यकांत सावंत, वनरक्षक नेरूर त हवेली सावळा कांबळे यांनी यशस्वी केली.

प्रतिक्रिया व्यक्त करा