बांदा
बांदा केंद्रशाळेच्या मुख्याध्यापिका यांना जर्नालिस्ट फाउंडेशन यांच्या वतीने राज्यभरातील विविध क्षेत्रात कार्यरत असलेल्या महिलांच्या अलौकिक कार्याप्रती बद्दल दिला जाणारा यावर्षीचा नवदुर्गा सन्मान पुरस्कार २०२१ शैक्षणिक क्षेत्रातील कार्याबद्दल बांदा नं .१ शाळेच्या उपक्रमशील मुख्याध्यापिका सरोज नाईक यांना वितरित करण्यात आला.
नुकताच विद्यानिकेतन पाचगणी येथे महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री अण्णासाहेब डांगे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या या कार्यक्रमात महाबळेश्वर-वाई विधानसभा क्षेत्राचे आमदार मकरंद पाटील ,सातारा जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष हरिष पाटणे ,पाचगणीच्या नगराध्यक्षा लक्ष्मीताई कराडकर ,सातारा जिल्ह्याच्या नगराध्यक्षा माधुरी कदम आधी विविध मान्यवरांच्या हस्ते सरोज नाईक यांना सन्मानचिन्ह व मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रमाला बांदा शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष निलेश मोरजकर, शिक्षक शरद नाईक केंद्रप्रमुख संदीप गवस ,उपशिक्षक जे .डी पाटील, स्वाती पाटील आदी उपस्थित होते. कोरोनाच्या पाश्वभूमीवर गेले दीड वर्षाहून अधिक काळा शाळा बंद असताना मुख्याध्यापिका सरोज नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली बांदा केंद्रशाळेत आँनलाईन स्पर्धात्मक उपक्रमांची प्रभावीपणे अमंलबजावणी करण्यात आली होती .तसेच या कालावधीत चार लाखाहून अधिक शैक्षणिक उठाव शाळेमध्ये करून विविध भौतिक सुविधा उपलब्ध करुन दिल्यात तसेच सामाजिक कार्यात त्या नेहमीच अग्रेसर असतात त्यांच्या या कार्याची दखल घेऊन पुरस्कारासाठी निवड झाली होती. सरोज नाईक यांना मिळालेल्या पुरस्काराबद्दल सर्वच स्तरावरून कौतुक करण्यात येत आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजीत नायार यांनी शाळा भेटी वेळी बांदा शाळेच्या मुख्याध्यापिका सरोज नाईक यांचे अभिनंदन केले .