तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी सह पदाधिकाऱ्यानी घेतली वीज वितरण अधिकाऱ्यांची भेट
सावंतवाडी
दिवाळीच्या पार्श्वभूमीवर महावितरणकडून वीज कापली जात आहे. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पदाधिकाऱ्यांकडून महावितरण उपकार्यकारी अभियंता एस. एस. भुरे यांची भेट घेतली. तालुक्यातील नागरिक बील भरतील त्यासाठी आम्ही देखील आवाहन करत आहोत. मात्र, सणासुदीच्या काळात महावितरणकडून वीज कनेक्शन कट करण्यात येऊ नये अशी मागणी केली. तर व्यापारी वर्गाची वीज कापल्यानं मालाच मोठ नुकसान होत असून सहकार्य करण्याचे आवाहन अधिकाऱ्यांना केलं. दरम्यान, सर्वसामान्यांनच्या व्यथांबाबत मंत्र्यांच लक्ष वेधल आहे अशी माहिती तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी यांनी दिली.
यावेळी राष्ट्रवादी शहराध्यक्ष देवेंद्र टेंमकर, आगोस्तीन फर्नांडिस, अफरोज राजगुरू, असलम खतिब, अर्षद बेग, आसिफ ख्वाजा, किशोर परब, संजय पालव, जाफर खानापुरी, इन्सुली, बांदा येथील पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.