बुधवारी सकाळपासून करूळघाटात करणार साखळी उपोषण…
वैभववाडी
वैभववाडी तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी करूळघाटत मार्गात पडलेल्या खड्ड्यांमुळे रस्ता वाहतुकीस नादुरूस्त झाला आहे. हा मार्ग वाहतुकीस सुरळीत करण्यासाठी निवेदन देण्यात आले आहे.याबाबत तहसिलदार श्री रामदास झळके यांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण विभागाच्या अधिकाऱ्यांना शेतकरी यांच्या सोबत बैठक आयोजित करण्याच्या सूचना देऊन ही दखल घेतली नाही.
आज मंगळवारी तहसीलदार रामदास झळके,पोलिस निरीक्षक अतुल जाधव यांनी शेतकऱ्यांशी चर्चा केली मात्र ठोस लेखी आश्वासन संबधीत अधिकाऱ्यांकडून मिळत नाही तोपर्यंत उपोषण करण्यावर ठाम असल्याचे सांगीतले.
या वर्षीचा ऊस गाळप हंगाम लवकरच सुरु होत आहे. येथील सर्व ऊस गगनबावडा तालुक्याती डॉ. डी. वाय . पाटील साखर कारखान्याला गाळपासाठी नेला जात असून वैभववाडी ते गगनबावडा या मर्गावर रस्ता वाहतुकिस पुर्णपणे नादुरुस्त झालेला आहे. तसेच करुळ घाटात मोठ मोठे खड्डे पडलेले असून ऊस वाहतूक करताना ट्रक पलटी होण्याची दाट शक्यता आहे. मागिल वर्षी ऊस वाहतुकिचे ट्रक पलटी होण्याच्या तीन चार घटना घडल्या आहेत त्यामुळे शेतक-च्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. सुदैवाने जिवीत हानी झाली नाही. घाट रस्त्याच्या या अशा अवस्थेमुळे गेले दोन – तीन वर्षे कोकणातील ऊस तोडणी घाट रस्ता दुरुस्त झाल्यानंतर जानेवारी – फेब्रुवारी महिन्यात सुरुवात केली जाते. कोकणातील उष्णता आणि रानटी जनावरे पासून उसाची मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. तसेच अती उष्णतेमुळे ऊसाच्या वजनात घट होत आहे. पर्यायाने गेली दोन वर्षे शेेेेेतकऱ्यांना घाटमार्ग दुरुस्त नसल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान सहन करावे लागत आहे. या बैठकीसाठी किशोर जैतापकर, सत्यवान तावडे,संतोष मांजरेकर ,विशाल पावसकर,विठोबा नारकर,संदिप तानवडे,राजेंद्र नारकर,नरेंद्र शिंदे उपस्थितीत होते