You are currently viewing उंबर्डे येथे कायदेविषयक जनजागृती कार्यक्रम संपन्न

उंबर्डे येथे कायदेविषयक जनजागृती कार्यक्रम संपन्न

वैभववाडी

कणकवली विधी सेवा प्राधिकरणाच्यावतीने उंबर्डे येथे कायदेविषयक जनजागृती कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमाला प्रमुख मार्गदर्शक वक्ते म्हणून ॲड.महेश रावराणे यांनी मार्गदर्शन केले. आजादी का अमृत महोत्सव या भारत सरकारच्या उपक्रमांतर्गत कणकवली विधिसेवा प्राधिकरणाच्या वतीने कणकवली वैभववाडी वकील संघटनेच्यावतीने हा कार्यक्रम उंबर्डे येथील ग्रामपंचायत येथे पार पडला. यावेळी तालुक्यातील अनेक गावचे सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक, अंगणवाडी सेविका, आशा वर्कर, बचत गटाचे सदस्य तसेच उंबर्डे येथील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कणकवली न्यायालयाकडून ॲड. महेश रावराणे यांची प्रमुख वक्ता म्हणून नेमणूक करण्यात आली होती. श्री. रावराणे यांनी फौजदारी कायद्याची व महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम मधील काही तरतुदी माहिती दिली. त्यामध्ये विशेष म्हणजे एफआयआर म्हणजे काय तसेच महसूल कायद्यातील विविध गाव नमुन्यांची कायदेशीर मार्गदर्शन केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा