सावंतवाडी
महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्रशिक्षण विभागाच्या वतीने श्री. पंचम खेमराज महाविद्यालय सावंतवाडी येथे मिशन युवा स्वास्थ्य मोहिमेअंतर्गत वरिष्ठ महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी लसीकरण कार्यक्रमाचे उद्घाटन सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षण प्रसारक मंडळाच्या कार्याध्यक्षा सौ. शुभदादेवी खेमसवांत भोसले यांच्या हस्ते दीप्रज्वलन करून करण्यात आले आहे.
याप्रसंगी व्यासपीठावर उपजिल्हा रुग्णालय सावंतवाडीचे डॉ. उत्तम पाटील, संस्थेचे सहसंचालक प्रा.डी.टी .देसाई, संस्थेचे सदस्य श्री जयप्रकाश सावंत, ॲड. शामराव सावंत, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी.एल. भारमल, प्राध्यापकवर्ग , शिक्षकेतर कर्मचारी कोविड लसीकरणात भाग घेतलेले विद्यार्थी व पालक उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा समन्वयक ‘मिशन युवा स्वास्थ्य’ सिंधुदुर्ग चे प्रा. आर. बी.शिंत्रे यांनी केले. डॉ उत्तम पाटील यांनी कोविड १९ प्रतिबंधक उपाययोजना व लसीकरण याबाबत उपस्थितांना मार्गदर्शन केले . आभार प्रा. आ. बी . शिंत्रे यांनी मानले. या कार्यक्रमात एकूण ३५ विद्यार्थ्यांचे लसीकरण करण्यात आले