दुबई
भारत पाकिस्तानच्या क्रिकेटच्या महायुद्धात पाकिस्तानने १० गडी राखून विजय संपादन केला . भारताने प्रथम फलंदाजी करत १५१ धावा पर्यंत मजल मारली. पण बाबर आझम ( ५२ चेंडूत नाबाद ६८) आणि मोहम्मद रिजवान(५५ चेंडूत नाबाद ७९) यांच्या फटकेबाजीच्या जोरावर सहज विजय संपादन केला.
भारताच्या एकाही गोलंदाजाला यश मिळाले नाही पाकिस्तानच्या शाहिन अफ्रिदीच्या (३(३१)) भेदक माऱ्यासमोर राहुल ,रोहित,सूर्या स्वस्तात बाद झाले.त्यानंतर भारतकडून कर्णधार विराट कोहलीने (४९ चेंडूत ५७ धावा) एकाकी झुंज दिली. त्याला यष्टिरक्षक ऋषभपंतने साथ देत ३० चेंडूत ३९ धावा केल्या. या सामन्यात के एल राहुल बाद झाला, तो क्षण कॅमेरा मध्ये टिपला.मात्र रीप्लेत नोबॉल असल्याचे स्पष्ट झाले. यामुळे भारतीय चाहत्यांच्या तिखट प्रतिक्रिया उमटल्या.
धावफलक :
भारत२० षटकात ७ बाद १५१
फलंदाजी: रोहित शर्मा (०), के एल राहुल (८),विराट कोहली(५७) सूर्यकुमार याधव (११),ऋषभ पंत (३९) रवींद्र जडेजा(१३) हार्दिक पांड्या (११) भुवनेश्वर कुमार(५)
गोलंदाजी: शाहीन आफ्रिदी (४-३१-३),इमाद वासिम (२-१०-०),हसन अली(४-४४-२), शाबाद खान,(४-२२-१),हाफिज(२-१२-०),रौफ(४-२५-१).
पाकिस्तान: १७.५ षटकात बिनबाद १५२.
फलंदाजी: मोहम्मद रिझवान(७९), बाबर आझम(६८)
गोलंदाजी: भुवनेश्वर(३-२५-९),शमी(३.५-४३-०), बुमराह (३-२२-०),वरून चक्रवती(४-३३-०),रवींद्र जडेजा (४-२८-०)