You are currently viewing माय बोली ….

माय बोली ….

जागतिक मराठी “साहित्य कला व्यक्ती” विकास मंचच्या सदस्या, विविध पुरस्कार प्राप्त जेष्ठ कवयित्री प्रा.सौ. सुमती पवार यांची खानदेशी, अहिराणी बोलीतील काव्यरचना

मायबोली मायबोली मनी अहिरानी माय
गोडी गुयनी तिले नि तपे दुधवर साय
माय माय म्हनताज भिडे व्हटले तो व्हट
कोनी आंगले भिडता करी देस त्याले नीट ….

खेत वावरमा देखो तिना रूबाबच न्यारा
बांध बांधले लेकरे तिना करतसं पुकारा
दमीभागी बठतसं निमनी त्या सावलीले
धुडकाम्हानी भाकर पहिले माय जमिनले…

घास लेवाना पयले चतकोर तो भूमीले
आन्न धान्य पिकाडसं पहिले माय ले नमिले
कोनी म्हनतस राम मंग खातस भाकर
कसा संस्कार देखा ना जरी सेतस चाकर ….

खेडाम्हान्या रीतीभाती मुरी जातीस आंगमा
येता जाता राम राम कोठे भेटी हो सांगाना ..
दिनभर वावरमां रातले भजन करतसं
व्हटं विठ्ठल विठ्ठल थकी भागी नि गातसं …

नामदेव तुकाराम ज्ञानदेव ना त्या ओव्या
असं रसाळ भजन जन डोलतीस काया
सुखदुख इसरीनं एकरंग हुई जास
विठुमाऊली सावता तठे अभंग गातसं …

भेदभाव सरी जास मनं इठ्ठल इठ्ठल
मनी एकच आस ती कवय इठाई भेटलं
पांडुरंग पांडुरंग नाद घुमस गावमा
गांव पावन पावन गांव ईठ्ठल व्हयनं ….

घरोघर अहिरानी ति मा प्रेम वसांडस
मनी अहिरानी माले गोड गोड हो लागस
तोंडभरी बोलतसं डोयाभरी हासतंस
मना नस नस मा हो अहिरानी दवडसं …

 

प्रा. सौ. सुमती पवार नाशिक
(९७६३६०५६४२)
दि: २४ ॲाक्टोबर २०२१
९ :३८ आते इतलामा लिखी बरं.. रातले

प्रतिक्रिया व्यक्त करा