प्रकल्प तात्काळ सुरु करा, अन्यथा दुसऱ्याला जागा देण्याची सुचना….
सावंतवाडी
येत्या दोन महिन्यात सातार्डा येथील उत्तमस्टील कंपनीने आपला प्रकल्प सुरू करावा, अन्यथा जागा भाडेतत्त्वावर किंवा विकत अन्य प्रकल्पाला द्यावी, अशा सुचना आमदार दीपक केसरकर यांनी संबंधित कंपनीच्या अधिकाऱ्यांना आज दिल्या आहेत.
यावेळी तालुकाप्रमुख रूपेश राऊळ, ज्येष्ठ नगरसेविका अनारोजीन लोबो, अशोक दळवी, बाबू कुडतरकर, सुरेंद्र बांदेकर, संजय पेडणेकर, प्रकाश बिद्रे आदि उपस्थीत होते.
केसरकर म्हणाले, सावंतवाडी विधानसभा मतदार संघात अनेक प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी मी स्वतः प्रयत्नशील आहे. अनेक गावा-गावा मधील रस्ते, पुल यांची कामे मी माझ्या मंत्री पदाच्या काळात पूर्ण केली. पण मुख्य रस्त्याचे काम थोडे बाकी आहे. ते ही लवरकच पूर्ण होणार आहे. मात्र येथील तरूणांना रोजगार कसा उपलब्ध होईल याकडे माझे लक्ष असून, दोडामार्ग-तिलारी येथे होणारा मोठा प्रकल्प तसेच अन्य काही छोटे मोठे उद्योग या परिसरात येत आहेत. जागेचा प्रश्न असून, तो दूर झाला तर अधिकच उद्योग आणू, असे केसरकर यांनी सांगितले. तर सार्ताडा येथील उत्तम स्टील प्रकल्पाच्या जागेवर स्टील प्रकल्प कंपनी करत नसेल तर ती जागा कंपनीने विकावी किंवा भाउेतत्कावर नवीन प्रकल्पाला तरी द्यावी कारण अनेक उद्योजक उद्योग व्यवसाय उभारण्यासाठी जागेच्या शोधात असून,ही मोकळी जागा मिळावी म्हणून मी स्वता उत्तम स्टील कंपनीच्या अधिकाऱ्यांशी बैठक केली असून त्यानी माझ्या कडे दोन महिन्याचा वेळी मागितला असल्याचे केसरकर यांनी यावेळी सांगितले. यावेळी आमदार केसरकर यांंच्या हस्ते सांगेली सरपंंच संजना राऊळ व सार्ताडा सरपंच संंजना मेस्त्री यांचा सत्कार करण्यात आला.