वर्षाताई गायकवाड यांचा क्रीडा शिक्षक महासंघ तर्फे सत्कार
तळेरे
राज्यात ४ ऑक्टोबर पासून पाचवी पासूनचे वर्ग सुरु झाल्याने मुलांना व शिक्षकांना मोठा दिलासा मिळाला. दिवाळीनंतर दुसरे सत्रात शाळा पूर्ण क्षमतेने चालू कराव्यात तसेच क्रीडा स्पर्धा बंद असल्याने खेळाडूंचे होणारे नुकसान पाहता क्रीडा स्पर्धांना परवानगी देण्यात यावी अशी मागणी शिक्षणमंत्र्यांना केली असून शाळा सुरु करण्याचा निर्णय शिक्षणमंत्र्यांनी घेतले बाबत महाराष्ट्र राज्य क्रीडा शिक्षण महासंघाचे वतीने राज्य अध्यक्ष राजेंद्र कोतकर, समन्वयक मच्छींद्र ओवाळ, राज्य कोअर कमिटी पदाधिकारी प्रमोद पाटील, संतोष सुर्वे यांनी शिक्षणमंत्री वर्षाताई गायकवाड यांचा सत्कार करण्यात आला.
सन २०१४ सालापासून शारीरिक शिक्षण शिक्षक संचमान्यते बाहेर आहे, त्यामुळे आयुक्तांनी शासनास सादर केलेल्या संचमान्यतेचे निकष रद्द न करता आवश्यक बदल व्हावे करीता शासन निर्णय, इतर राज्यातील शारीरिक शिक्षक भरती प्रक्रिया व प्राप्त परिस्थितीची माहिती निवेदनासोबत दिली असून सन २०२१-२२ ची संचमान्यता नवीन निकषानुसार तातडीने लागू करावी, शारीरिक शिक्षक भरती पूर्ण क्षमतेने व्हावी, निवड श्रेणीची जाचक अट रद्द करावी, आश्वासित प्रगती योजना लागू करावी यावी, नवीन शैक्षणिक धोरण समितीत शारीरिक शिक्षण शिक्षक प्रतिनिधी असावा या व इतर मागण्यां बाबत शिक्षणमंत्र्यांना साकडे घालण्यात आले.
संचमान्यतेतील बदलाची प्रक्रिया सुरू -: वर्षाताई गायकवाड
संघटना पदाधिकारी यांच्यासोबतच्या चर्चेनंतर
बोलताना उत्तरादाखल शालेय शिक्षण मंत्री वर्षाताई गायकवाड म्हणाल्या, संचमान्यते संदर्भात अनेक तक्रारींची दखल घेत संचमान्यतेच्या बदलाची प्रक्रिया चालू असून शारीरिक शिक्षण भरती व पदाबाबत त्रुटी नक्की दूर करू, क्रीडा स्पर्धा चालू करण्याबाबत आरोग्य व क्रीडा विभाग यांचेशी विचारविनीमय करून मुख्यमंत्री योग्य तो निर्णय घेण्याबाबत सकारात्मक आहेत, तसेच विविध प्रश्नांबाबत सर्व संघटनांसोबत लवकरच बैठक घेऊ असे शिक्षणमंत्र्यांनी शिष्टमंडळास आश्वासित केलेची माहिती राज्य समन्वयक दत्तात्रय मारकड, शारीरिक शिक्षण व क्रीडा शिक्षक महासंघ सिंधुदुर्गचे जिल्हाध्यक्ष बयाजी बुराण, राज्य युवा सचिव दिनेश म्हाडगूत यांनी दिली.
या भेटी दरम्यान शारीरिक शिक्षकांच्या विविध मागण्या तसेच क्रीडा स्पर्धा सुरू करणे संबंधीच्या मागण्यांचे निवेदन शिक्षणमंत्र्यांना देण्यात आले. निवेदनावर आनंद पवार, राजेश जाधव, राजेंद्र पवार, घनःशाम सानप, राजेश कदम, विलास घोगरे, कैलास माने, डॉ जितेंद्र लिंबकर, लक्ष्मण बेल्लाळे, प्रितम टेकाडे यांच्या सह्या होत्या.