You are currently viewing प्लेटलेट्स डोनेशन करून युवा रक्तदाता संघटनेने वाचवला रुग्णाचा जीव

प्लेटलेट्स डोनेशन करून युवा रक्तदाता संघटनेने वाचवला रुग्णाचा जीव

सावंतवाडी

उपजिल्हा रुग्णालयामध्ये अॅडमिट असलेल्या रविकिरण कलांगण या रुग्णाला तातडीने ओ पाॅझिटिव्ह या रक्तगटाच्या प्लेटलेट्सची गरज होती. सहा दात्यांची तातडीनं आवश्यकता असताना युवा रक्तदाता संघटना मदतीस धावून आली‌. या रुग्णासाठी शहरातील व्यापारी प्रकाश चौधरी, अवधूत गावडे, आशिष साखळकर यांनी तातडीनं ओरोस जिल्हा रुग्णालय रक्तपेढीमध्ये जाऊन प्लेटलेट डोनेशन केले.

दरम्यान, ओरोस जिल्हा रुग्णालयामध्ये अॅडमिट असलेल्या गीता वासुदेव पडवळ या रुग्णाला तातडीने ए पाॅझिटिव्ह या रक्तगटाच्या प्लेटलेट्स ची गरज होती. तेव्हा असनिये येथील युवक हरी परांजपे, सुजय कोठावळे यांनी ओरोस जिल्हा रुग्णालय रक्तपेढीमध्ये जाऊन प्लेटलेट डोनेशन करत रूग्णांचे जीव वाचवले. यासाठी युवा रक्तदाता संघटनेचे अध्यक्ष देव्या सुर्याजी यांच्या विशेष प्रयत्नातून रक्तदाते उपलब्ध करुन दिले. तर सध्या जिल्ह्यात रक्ताचा तुटवडा असून रक्तदानासाठी युवकांनी पुढाकार घेण्याच आवाहन केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा