वेंगुर्ले
वेंगुर्ला नगरपरिषद हद्दीतील सर्व मालमत्तांचे सर्वेक्षण एका खाजगी एजन्सी मार्फत नगरपरिषदेमार्फत पूर्ण करण्यात आले आहे. या सर्वेक्षणादरम्यान भरलेले माहितीचे फॉर्म नगरपरिषद मुख्य कार्यालयाच्या दुसऱ्या मजल्यावरील स्वामी विवेकानंद सभागृह येथे नागरिकांना पाहण्यासाठी उपलब्ध केलेले आहेत. नागरिकांनी हे फार्म ३० ऑक्टोंबर पर्यंत तपासून पहावे व तक्रार असल्यास किंवा अधिक माहिती पुरवायची असल्यास लेखी पत्राद्वारे नगरपरिषद कार्यालयास कळवावे असे आवाहन नगराध्यक्ष दिलीप गिरप यांनी केले आहे.
नगरपरिषदेमार्फत जो सर्व्हे झालेला आहे, त्याची पूर्ण माहिती फॉर्म सह एकत्रित करण्यात आली आहे. प्रत्येक वॉर्ड नुसार ही गोळा झालेली माहिती प्रत्येकाची योग्य आहे की नाही याची पहाणी नागरिकांनी करून खात्री करावी. तसेच आपल्या मालमत्तेकरीता भरलेल्या फॉर्ममधील माहिती तपासून त्याबाबत काही तक्रार असल्यास किंवा अधिकची अथवा या अगोदर न दिलेली माहिती द्यावयाची असल्यास तसे लेखी पत्राद्वारे नगरपरिषदेच्या नागरी सुविधा केंद्रात सादर करावयाची आहे.
ह्या सर्वेक्षणाची माहिती नागरिकांना सेवा पुरवण्याच्या दृष्टीने अत्यंत महत्वाची असल्याने प्रत्येक नागरिकाने नगरपरिषद कार्यालयास भेट देऊन आपण पुरविलेल्या माहितीची खात्री करून घ्यायची आहे,असेही म्हटले आहे