ग्राहक पंचायत महाराष्ट्र संस्थेचे आयोजन.
वैभववाडी/सिंधुदुर्ग.
ग्राहक पंचायत महाराष्ट्र आयोजित सामाजिक चातुर्मास २०२१ ‘१३’वे पुष्प–कोकण विभाग, मुंबई- ठाणे जिल्ह्यातर्फे संपुर्ण महाराष्ट्रातील ग्राहक बंधू-भगिनींसाठी आयोजित करण्यात आले आहे.
ग्राहक पंचायत महाराष्ट्र संस्थेच्यावतीने सामाजिक चातुर्मास 2021 चे आयोजन जुलै २०२१ पासून सुरू आहे आतापर्यंत पुणे, औरंगाबाद व नाशिक विभागाने सामाजिक चातुर्मास अंतर्गत प्रबोधन व्याख्यानमालेचे यशस्वी आयोजन केले आहे. या सामाजिक चातुर्मासाचे १४ वे पुष्प कोकण विभाग- मुंबई- ठाणे जिल्ह्याच्यावतीने रविवार दिनांक २४ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ठीक साडे चार वाजता ऑनलाईन पद्धतीने कोकण विभाग अध्यक्ष व राज्य सदस्य प्रा.श्री.एस.एन.पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आले आहे.
या कार्यक्रमाला शासकीय अधिकारी तथा प्रमुख अतिथी म्हणून मा. संतोष ममदापुरे, कक्ष अधिकारी, मंत्रालय मुंबई हे “महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम” या विषयावर तर प्रमुख वक्त्या म्हणून मा. वर्षा विद्या विलास या “भारतीय संविधानातील ७४ वी घटनादुरुस्ती महानगरपालिका, नगरपरिषद व नगरपंचायत स्तरावर लोकसहभाग” या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत. या ऑनलाईन ज्ञानपूर्ण कार्यक्रमाचा सर्व साधक/नागरिकांनी पुढील युट्युब किंवा फेसबुक लिंकवरूनआवश्य लाभ घ्यावा.
https://youtu.be/7NQxqgw3zCI