You are currently viewing गेल्या सहा-सात वर्षांपासून आश्वासनांचा पाऊस पाडणाऱ्यांनी जनतेचा त्रास कमी करण्यासाठी प्रत्यक्षात काहीतरी करावे..

गेल्या सहा-सात वर्षांपासून आश्वासनांचा पाऊस पाडणाऱ्यांनी जनतेचा त्रास कमी करण्यासाठी प्रत्यक्षात काहीतरी करावे..

दसरा झाला दिवाळी आली खड्डेमय परिस्थितीची तोंडी जबाबदारी घेणाऱ्या कुडाळ-मालवणच्या आमदारांनी घेतलेल्या जबाबदारीची जाणीव ठेवावी.:- कुणाल किनळेकर जिल्हाध्यक्ष मनविसे.

पावसाळ्यातील खड्डेमय परिस्थितीमुळे जनसामान्यांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागला अनेक अपघातही घडले. आता पावसाळ्यानंतर याच निकृष्ट रस्त्यांच्या खड्डेमय परिस्थितीमुळे येत्या काळात मोठ्या प्रमाणात धुळीचे साम्राज्य पसरून श्वसनाचे आजार उद्भवण्यास सुरुवात होईल. सामान्य जनतेला दिलासा द्यायचा सोडूनच द्या परंतु गेल्या सहा ते सात वर्षापासून जो मानसिक आणि शारीरिक त्रास होत आहे त्याची ही जबाबदारी सुद्धा या सत्ताधारी पक्षाच्या आमदार, खासदार व पालकमंत्री यांनी घ्यावी व सामान्य नागरिकांना होणारा जिवघेणा त्रास कमी करण्यासाठी नुसती निवडणूक पुर्व घोषणा सोडून प्रत्यक्षात काही उपाययोजना कराव्यात.
आता पर्यंत जिल्ह्यातील विरोधी पक्ष म्हणून मनसेच या जिल्ह्यातील खड्डेमय परिस्थितीची जाणीव या सत्ताधाऱ्यांना आंदोलने तसेच सोशल मीडिया व वृत्तपत्रांच्या माध्यमातून करत आलेली आहे आणि आता तर कुडाळ-मालवण ची सामान्य जनता ही या सत्ताधाऱ्यांच्या विरोधात ठिकठिकाणी उपहासात्मक बॅनर लावत होते व येत्या काळात हीच सामान्य जनता रस्त्यावर उतरुन उग्र आंदोलन पुकारणार आहे. याच उदाहरण म्हणजे काही दिवसांपूर्वी मालवण तालुक्यातील तळाशील गावातील आंदोलन तसेच येत्या दि २५ रोजी नेरूर गोंधयाळे ता.कुडाळ येथील ग्रामस्थांनी पुकारलेले जन आंदोलन होय.
नुसतीच पोकळ आश्वासनांची जबाबदारी घेणाऱ्या आमदार वैभव नाईक यांनी प्रत्यक्षात निधी खेचून आणण्याची धमक दाखवावी असा टोला मनविसे जिल्हाध्यक्ष कुणाल किनळेकर यांनी लगावला आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा