You are currently viewing आमदार नितेश राणे यांच्या पाठपुराव्यातून कणकवली नगरपंचायत ला वातानुकूलीत शवपेटी

आमदार नितेश राणे यांच्या पाठपुराव्यातून कणकवली नगरपंचायत ला वातानुकूलीत शवपेटी

नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी केली होती मागणी

भाजपा ओबीसी मोर्चा चे नरेंद्र गावकर, विजय घरत यांच्या माध्यमातून उद्या शवपेटी करणार सुपूर्द

कणकवली :

आमदार नितेश राणे यांच्या पाठपुराव्यातून कणकवली नगरपंचायत ला वातानुकुलीत शवपेटी उपलब्ध होणार आहे. कणकवली नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी शवपेटी ची मागणी आमदार नितेश राणे यांच्याकडे केली होती. त्यानंतर आमदार नितेश राणे यांनी या संदर्भात नगराध्यक्ष समीर नलावडे यांना शहरवासीयांसाठी ही सुविधा उपलब्ध करण्याचा शब्द दिला होता. त्या नुसार भाजपा ओबीसी मोर्चा च्या वतीने नरेंद्र गावकर व विजय घरत यांच्या वतीने उद्या गुरुवार 21 ऑक्टोबर रोजी सकाळी 11 वाजता नगराध्यक्ष समीर नलावडे यांच्याकडे ही शवपेटी सुपूर्द करण्यात येणार आहे. शहरातील मृत झालेल्या नागरिकांचे मृतदेह ठेवण्याकरिता कणकवली उपजिल्हा रुग्णालयात दोनच शवपेटी असल्याने अनेकदा ताटकळत राहावे लागते. यामुळे नातेवाईकांनाही त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे कणकवली शहराचे वाढते विस्तारीकरण व शहराची असलेली गरज या दृष्टीने नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी ही मागणी केली होती. त्यानुसार आमदार नितेश राणे यांनी याबाबत शहरवासीयांच्या सुविधे करिता ही मागणी पूर्ण करण्याची ग्वाही दिली होती. त्याची पूर्तता अखेर उद्या होनार आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा