You are currently viewing शरद पौर्णिमा ….

शरद पौर्णिमा ….

जागतिक मराठी “साहित्य कला व्यक्ती” विकास मंचच्या सदस्या, विविध पुरस्कार प्राप्त जेष्ठ कवयित्री प्रा.सौ. सुमती पवार यांची काव्यरचना

शरद पौर्णिमा ….

को जागर्ती को जागर्ती साद घाले लक्षुमी
पौर्णिमेच्या चांदण्यात या सुख शांतीची हमी
अमृत कलशातून लक्षुमी आणि ज्ञान वैभव
सुखसमृद्धीची हमी देतसे चांदण्यात निरव …

 

दसरा होतो पहा साजरा शरद पौर्णिमा येते
सुका मेवा टाकूनी दूध ते चंद्र प्रकाशी न्हाते
चंद्र येतसे पृथ्वी जवळी पडे चांदणे दाट
गुण वाढती दुधातले मग प्यावे काठोकाठ…

 

आनंदाचा जणू सण हा गर्बा खेळती लोक
कौमुदीत नाहतात सारे भागवती हो शौक
खगोलशास्रिय दृष्ट्या चांदणे आहे शुद्ध सात्विक
सुकामेवा हा दुधात टाकून शांत ठेवा मस्तिष्क …

 

सगे सोयरे जमतां सारे प्रसन्नता वाढते
चेहरे खुलती साऱ्यांचे नि दूध गोड लागते
गल्लो गल्ली सर्वसुखाची जणू मांदियाळी
सण सुखाने होती साजरे पौर्णिमा असो होळी…

 

परंपरा ह्या आनंदाच्या सण उत्सवांच्या
शुद्ध सात्विक ठेवा भावना गोड जाणिवांच्या ….

प्रा.सौ.सुमती पवार नाशिक
(९७६३६०५६४२)

प्रतिक्रिया व्यक्त करा