मुंबई :
मराठा आरक्षणाला न्यायालयाने दिलेल्या स्थगितीमुळे राज्यभर मराठा समाज आक्रमक झाला होता. न्यायालयाने तात्काळ आरक्षणावरील स्थगिती हटवावी अशी मागणी सुद्धा राज्यभरातून होत होती. त्या पार्श्वभुमीवर ठाकरे सरकारने आज सर्वोच्च न्यायालयाला विनंती अर्ज पाठवला आहे. नेमकं आता सर्वोच्च न्यायालय काय भुमिका घेते याकडे राज्याचे लक्ष लागले आहे. दरम्यान, मराठा आरक्षणाला न्यायालयने स्थगिती दिल्यामुळे राज्यभर ठाकरे सरकार विरोधात मराठा समाज आक्रमक झाला होता. आज सोलापूर, पंढरपूर, हिंगोली, परभणी, औरंगाबाद, सिंधुदुर्गसह राज्याभरात मराठा क्रांती मोर्चाचे पडसाद उमटले होते. न्यायालयाने मराठा आरक्षणाची स्थगिती हटवावी अशी मागणी केली जात होती. आणि आज राज्य सरकारने स्थगिती हटवण्यासाठी न्यायालयाला विनंती अर्ज सादर केला आहे.