सिंधुदुर्ग जिल्हा चर्मकार समाज उन्नती मंडळ उभारणार हुमरमळा येथे समाज भवन
कणकवली :
सिंधुदुर्ग जिल्हा चर्मकार समाज उन्नती मंडळ जिल्हा सिंधुदुर्गच्या वतीने आमदार वैभव नाईक यांचे स्थानिक आमदार निधीतून भवनाच्या प्राथमिक बांधकामास सुरुवात होणार असून भवनाचा भूमिपूजन कार्यक्रम रविवार 31 ऑक्टोबर 2021 रोजी हुमरमळा ता.कुडाळ येथे संपन्न होणार असल्याची माहिती जिल्हाध्यक्ष सुजित जाधव व जिल्हा सरचिटणीस चंद्रसेन पाताडे यांनी दिली आहे.
संत रविदास भवन इमारतीचा संकल्प चर्मकार समाजने सोडला होता.यासाठी तत्कालीन जिल्हाध्यक्ष अनिल निरवडेकर यांच्या काळात हुमरमळा ता.कुडाळ येथे मंडळाचे नावे जागा घेण्यात आली होती.त्यानंतर याजागी भवन उभारावे म्हणून विद्यमान कार्यकारिणीने प्रयत्न सुरू केले होते.सुमारे 1 कोटी एवढ्या अंदाजपत्रकाच्या बांधकामाचे उद्दिष्ट असून यातील सुरुवातीचे काम आमदार वैभव नाईक यांचे स्थानिक आमदार निधीतून करण्यात येणार आहे.यासाठी आज आमदार नाईक यांची समाज मंडळाच्या वतीने भेट घेऊन भूमीपूजनाची तारीख निश्चित करण्यात आली.यावेळी आमदार नाईक यांना समाज भवनाचे रेखाचित्र देण्यात येऊन माहिती देण्यात आली.यावेळी जिल्हाध्यक्ष सुजित जाधव ,जिल्हा सरचिटणीस चंद्रसेन पाताडे,जिल्हा कोषाध्यक्ष नामदेव जाधव,समिती प्रमुख महेंद्र चव्हाण, महानंद चव्हाण, लवेंद्र किंजवडेकर ,मालवण तालुकध्यक्ष सुनील पाताडे, जिल्हा सदस्य प्रभाकर चव्हाण, मधुकर चव्हाण,प्रसाद पाताडे,मनोहर पाताडे,नितीन पाताडे,समीर धमापूरकर,रुपेश जाधव, रोशन जाधव, सूरज जाधव, विठ्ठल चव्हाण, सुदर्शन तेंडुलकर, अनिल जाधव , अमित जाधव,मयूर चव्हाण,अमरेश तेंडुलकर आदी उपस्थित होते.