You are currently viewing सामाजिक चातुर्मासाचे १३ वे पुष्प आज दि.१७ रोजी

सामाजिक चातुर्मासाचे १३ वे पुष्प आज दि.१७ रोजी

ग्राहक पंचायत महाराष्ट्र संस्थेचे आयोजन.

वैभववाडी

ग्राहक पंचायत महाराष्ट्र आयोजित सामाजिक चातुर्मास २०२१ ‘१३’वे पुष्प – कोकण विभाग-सिंधुदुर्ग जिल्हा तर्फे संपुर्ण महाराष्ट्रातील ग्राहक बंधू-भगिनींसाठी आयोजित करण्यात आले आहे.
ग्राहक पंचायत महाराष्ट्र संस्थेच्यावतीने सामाजिक चातुर्मास 2021 चे आयोजन जुलै 2021 पासून सुरू आहे आतापर्यंत पुणे, औरंगाबाद व नाशिक विभागाने सामाजिक चातुर्मास अंतर्गत प्रबोधन व्याख्यानमालेचे यशस्वी आयोजन केले आहे. या सामाजिक चातुर्मासाचे तेरावे पुष्प कोकण विभाग- सिंधुदुर्ग जिल्ह्याच्यावतीने रविवार दिनांक १७ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ठीक साडे चार वाजता ऑनलाइन पद्धतीने राज्याचे सचिव श्री.अरुणजी वाघमारे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आले आहे.
या कार्यक्रमाला शासकीय अधिकारी तथा प्रमुख अतिथी म्हणून मा. प्रमोद जाधव, उप आयुक्त, समाजकल्याण सिंधुदुर्ग हे “सहज सुलभ जात प्रमाणपत्र पडताळणी” या विषयावर तर प्रमुख वक्ते म्हणून सतीश पाटणकर हे “पर्यटनातील मानबिंदू- सिंधुदुर्ग” या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत. या ऑनलाईन ज्ञानपूर्ण कार्यक्रमाचा सर्व साधक/नागरिकांनी पुढील युट्युब किंवा फेसबुक लिंकवरूनआवश्य लाभ घ्यावा.

https://youtu.be/gTyzynCXW7M

https://www.facebook……..

कृपया सदर कार्यक्रमाची लिंक आपल्या सर्व समूहांवर आणि मित्रांना प्रसारित करावी.
येणारे पुढील सर्व कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी वरील लिंक *“Like”* आणि *“Subscribe”* करा.
*असे आवाहन-ग्राहक पंचायत महाराष्ट्र, कोकण विभाग.* सिंधुदुर्ग जिल्हा यांच्यावतीने करण्यात आले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

three × three =