You are currently viewing सावंतवाडी मोती तलावात आता बदकांचा विहार

सावंतवाडी मोती तलावात आता बदकांचा विहार

सावंतवाडी

ऐतिहासिक वारसा लाभलेल्या सावंतवाडी शहराचे हदय असणाऱ्या मोती तलावात भाजप प्रदेश सचिव निलेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत बदक सोडण्यात आली. सावंतवाडी नगरपरिषदेच्या माध्यमातून हा उपक्रम राबविण्यात आला आहे. पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी तलावात संचार करणारी बदक मोहिनी घालणार आहे. या बदकांच्या अदा मोबाईल मध्ये टीपण्यासाठी देखील तलावाकाठी नागरिक उपस्थित होते.
सावंतवाडी तालुका पर्यटन व्यवसायिक महासंघाने नगराध्यक्ष संजू परब यांच्याकडे ही मागणी केली होती. त्याची पूर्तता नगराध्यक्ष संजू परब यांनी केली असून पर्यटन महासंघाच्या मागणीला यश आलं आहे.
याबद्दल सावंतवाडी तालुका पर्यटन व्यवसायिक महासंघाने त्यांचे आभार मानले. सावंतवाडी शहरात पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी याचा निश्चितच उपयोग होईल असा विश्वास पर्यटन व्यावसायिक महासंघाचे तालुकाध्यक्ष जितेंद्र पंडीत यांनी व्यक्त केला.
यावेळी नगराध्यक्ष संजू परब, भाजप शहराध्यक्ष अजय गोदावळे, आरोग्य सभापती सुधीर आडिवरेकर, पाणीपुरवठा सभापती उदय नाईक, नगरसेवक राजू बेग,मनोज नाईक, आनंद नेवगी, दीपाली भालेकर, पर्यटन महासंघाचे कार्याध्यक्ष सतीश पाटणकर, डी. के. सावंत, जितेंद्र पंडित, दिलीप भालेकर, आनंद शिरवलकर, बांदा सरपंच अक्रम खान, बंटी पुरोहित, मकरंद तोरसकर, केतन आजगावकर, संजय नाईक, अँड. अनिल निरवडेकर, सत्या बांदेकर, यांसह भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा