You are currently viewing भाजप महिला मोर्चाच्या वतीने सांर्गिडेवाडी येथे कन्यापुजन कार्यक्रम संपन्न

भाजप महिला मोर्चाच्या वतीने सांर्गिडेवाडी येथे कन्यापुजन कार्यक्रम संपन्न

कुडाळ :

सांगिर्डेवाडी कुडाळ येथे श्री. परब यांच्या निवासस्थानी महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष *सौ.संध्या प्रसाद तेरसे* यांच्या प्रमुख उपस्थितीत भाजपाच्या जेष्ठ नगरसेविका आणि आमच्या मार्गदर्शक सौ.उषा आठल्ये यांच्या अध्यक्षतेखाली शारदीय नवरात्रोत्सवानिमित्त *कन्यापूजन* कार्यक्रमाचे *महिला मोर्चा उपाध्यक्ष सौ.मुक्ती परब* यांनी आयोजन केले.

यावेळी उपस्थित बालिकांचे पूजन करुन त्यांना भेटवस्तू तसेच खाऊ देण्यात आला.या कार्यक्रमास जिल्हा सरचिटणीस सौ.रेखा काणेकर,जिल्हा कार्यकारीणी सदस्य सौ.साक्षी सावंत,तालुका चिटणीस सौ.रेवती राणे,शहर अध्यक्षा सौ.ममता धुरी , शहर सरचिटणीस सौ.अक्षता कुडाळकर, सौ.ममता कुंभार,उपाध्यक्ष सौ.मुक्ती परब,सौ.तेजस्विनी वैद्य,चिटणीस,सौ.विशाखा कुलकर्णी, सौ.प्राची आठल्ये, सौ.राणे,सौ.परब तसेच स्थानिक महिला आणि *खास निमंत्रित सांगिर्डेवाडीतील बालिका* उपस्थित होत्या .

प्रतिक्रिया व्यक्त करा