सिंधुदुर्ग :
जिल्हा कोविड रुग्णालयातील विविध समस्यांबाबत भाजपा प्रदेश सरचिटणीस प्रमोद जठार यांनी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली. कमी असलेला स्टाफ, जेवणासोबत पिण्याच्या पाण्याची व्यवस्था ऑक्सीजन सिलेंडरच्या पुरवठ्याबाबत नियोजन रेमिडीसिविर इंजेक्शन उपलब्ध करणे, कोरणा काळात काम करणाऱ्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना पगार दुप्पट देणे आदी मागण्यांसंदर्भात चर्चा करण्यात आली. या मागण्याची आठ दिवसात पूर्तता करण्यात यावी अशी मागणी यावेळी श्री. जठार यांनी केली.
केलेल्या मागण्यांनबाबत जिल्हाधिकारी सकारात्मक असल्याचे माजी आमदार तथा भाजपचे प्रदेश सरचिटणीस प्रमोद जठार यांनी सांगितले.
जिल्हा रुग्णालयात 20% स्टाफ वर काम सुरू आहे. याबाबत काय नियोजन करण्यात आले आहे अशी विचारणा करण्यात आली असता यावेळी डॉक्टर स्टाफ कमी असून याबाबतचे नियोजन सुरू असल्याचे जिल्हाधिकार्यांनी सांगितले. यासाठी तालुका सेंटर वरून डॉक्टरांना जिल्हा कोविंड रुग्णालयात आणल्यास येथील यंत्रणा कमी पडणार. याकडेही लक्ष वेधण्यात आले. कार्यरत असलेल्या नर्सेस डॉक्टर यांना दुप्पट वेतन द्या पुढील भरतीत त्यांना विशेष गुण देऊन समावेश करण्याबाबतची हमी द्या त्यांचा चार-चार महिने न होणारा पगार वेळेत द्या, काम केलेल्या कर्मचाऱ्यांना त्याबाबतचे प्रमाणपत्र द्या आमची मागणी शासनापर्यंत कळवा अशी मागणीही यावेळी करण्यात आली. रुग्णालयात उपचार घेत असलेल्या रुग्णांना जेवणासोबत एक एक लीटर पाणी द्या. ज्या ठिकाणी जेवण बनविले जाते त्या कॅंटीनमध्ये दुरावस्था असून त्याकडे लक्ष घालण्याची मागणीही करण्यात आली. जिल्ह्यात ऑक्सिजन पुरवठा अनियमित आहे जिल्ह्यातून ऑक्सिजन साठी सध्या पळापळ सुरू आहे. याकडे लक्ष वेधण्यात आले कोरोना सुरू होऊन सहा महिने उलटले तरी ऑक्सीजन प्लांट बाबत सत्ताधारी झोपले होते का? असा सवालही त्यांनी केला आहे. रेमीडीसीवीर इंजेक्शन दररोज शंभर संपतात त्यासाठी नातेवाईकांना पळापळ करावी लागते. याबाबत नियोजन करून 2 ते 5000 इंजेक्शन उपलब्ध करा अशी मागणी करण्यात आली. या सेंटरमध्ये गरम पाण्याचे सहा डिस्पेंसर द्या अशी मागणी केली, त्यावर आठ दिवसात कार्यवाही करण्याचे आश्वासन जिल्हाधिकाऱ्यांनी दिले असेच श्री. जठार यांनी सांगितले. 108 एम्बुलेंस कंपनीकडून दुरुस्त केल्या जात नाहीत. आपली नोकरी जाईल या भीतीने चालकांना त्या दुरुस्त कराव्या लागत आहेत त्यांचा विमा ही नाही या दुरवस्थेकडे तातडीने लक्ष देण्याची मागणी करण्यात आली. सदर सेंटर मध्ये कर्मचारी कमी असल्याने एका रुग्णाचे पाच पाच नातेवाईकात मध्ये जातात यातून कोरोना चा प्रसार होऊ शकतो याबाबतची व्यवस्था करण्याची मागणी श्री. जठार यांनी जिल्हाधिकारी के. मंजूलक्ष्मी यांच्याकडे केली.