दोडामार्ग :
मराठा आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा तापला आहे . मराठा आरक्षणाला दिलेली स्थगिती त्वरित उठवावी त्याचप्रमाणे जोपर्यंत आरक्षणाबाबत योग्य तो निर्णय होत नाही तोपर्यंत कोणतीही सरकारी नोकर भरती करू नये, असे निवेदन आज दोडामार्ग तहसीलदार यांना मराठा समाजातर्फे चंद्रशेखर देसाई यांच्या नेतृत्वाखाली देण्यात आले.
कोणत्याही परिस्थितीत मराठ्यांना आरक्षण हे मिळालेच पाहिजे अन्यथा उग्र आंदोलन छेडण्यात येईल सध्या कोरोना काळात असलेली परिस्थिती लक्षात घेता कोणतेही आंदोलन करण्यात येत नाहीये परंतु मराठा समाज हा अन्याय कोणत्याही परिस्थितीत सहन करणार नाही, मराठ्यांचे आंदोलन हे हक्काचे आहे आणि ते त्यांना मिळालेच पाहिजे यासाठी सरकारला दखल घेण्याजोगे आंदोलन केले जाईल, तसेच मराठा बांधवांच्या सह्यांची मोहीम राबवली जात आहे त्याचेही निवेदन लवकरच देण्यात येईल असे या वेळी चंद्रशेखर देसाई म्हणाले. छत्रपती शिवाजी महाराज्यांच्या भगव्या झेंड्याखाली मराठे आपला हक्क निश्चित मिळवतील असेही ते यावेळी म्हणाले.
यावेळी चंद्रशेखर देसाई यांच्यासह अनेक मराठा बांधव उपस्थित होते.